50 हजाराची लाच घेताना सहायक निबंधकाला रंगेहाथ पकडले

नगरच्या लाचलुचपत विभागाची कारवाई
50 हजाराची लाच घेताना सहायक निबंधकाला रंगेहाथ पकडले

अहमदनगर|Ahmedagar

पतसंस्थेने कर्जदाराच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीत त्याच्या बाजूने निकाल देण्याकरीता 50 हजार रूपयांची लाच घेताना सहायक निबंधकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सुदाम लक्ष्मण रोकडे (वय 52 रा. केडगाव) असे पकडलेल्या निबंधकाचे नाव आहे. नगरच्या लाचलुचपत विभागाने शहरातील कायनेटिक चौकात एका हॉटेलमध्ये गुरूवारी ही कारवाई केली.

यातील तक्रारदार यांनी एका पतसंस्थेकडुन 2014 मध्ये सोने तारण ठेऊन 30 लाख रूपये कर्ज घेतले होते. संबधित प्रकरणात पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार यांनी न्यायालयाचे आदेशानुसार पतसंस्थेचे कर्जाची सर्व रक्कम भरली होती. रक्कम भरून देखील पतसंस्थेने तक्रारदार यांचे विरुद्ध सहकारी पतसंस्था फेडरेशन अहमदनगर यांचेकडे कलम 101 नुसार तक्रारदार यांचे कडुन वसुलीची कारवाई करणेचे आदेश मिळणेकरिता प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात सहायक निबंधक सुदाम रोकडे यांनी तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला होता. तक्रारदार यांचे बाजुने निकाल दिला म्हणून त्याच्या मोबदल्यात रोकडे यांने तक्रारदार यांचेकडे गुरूवारी केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान एक लाखाची मागणी केली. तडजोडीअंती 50 हजार लाचेची मागणी पंचासमक्ष करून आयोजित लाचेचा सापळा कारवाई दरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताना रोकडे याला रंगेहाथ पकडले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com