बाजार समितीविषयी 'तो' आरोप राज्यमंत्र्यांनी फेटाळला

बाजार समितीविषयी 'तो' आरोप राज्यमंत्र्यांनी फेटाळला

अहमदनगर (प्रतिनिधी)

महाविकास आघाडीतील मंत्री (Maha Vikas Aghadi Minister) पदाचा गैरवापर करुन नगर बाजार समितीवर (Ahmednagar Market Committee) चौकशी व कारवाईसाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी संचालकांनी केला आहे. हे आरोप राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister Prajakta Tanpure) यांनी फेटाळले आहेत.

प्रशासकीय अधिकारी कायदा व नियमनुसार काम करतात. ते मंत्र्यांचे ऐकूण काम करत नाही, असे ते म्हणाले. राज्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी संदर्भात आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे १५ हजार अर्ज भरून घेण्यात आले आहे. त्यांना केंद्राच्या अपत्ती व्यवस्थापन योजनेनुसार मिळणाऱ्या निधीपेक्षा जास्त मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागात वीजपुरवठा तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या न होत्या. त्यानुसार कारवाई सुरू आहे. जिल्ह्याचे , पालकमंत्री या आठवड्यात दौऱ्यावर येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com