राणेंना चिमटा, फडणवीसांना टोमणा अन् गडाखांवर विश्वास

सोनईतील कार्यक्रमात खासदार राऊतांची फटकेबाजी || शिवसेनेचा जिल्हा म्हणून लवकरच नगरची ओळख
राणेंना चिमटा, फडणवीसांना टोमणा अन् गडाखांवर विश्वास

सोनई |वार्ताहर |sonai -

आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी शनिवारी सोनई (Sonai) येथे जोरदार फटकेबाजी केली. आजपर्यंत साखर सम्राटांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला नगर जिल्हा शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) आमच्यात आल्याने लवकरच शिवसेनेचा जिल्हा (Shivsena District) म्हणून ओळखला जाईल. गडाख लवकरच डरकाळी फोडतील, असा विश्वास व्यक्त करत खासदार राऊत यांनी ‘शिवसैनिक कुठेही गेला तरी त्याची ओळख बदलत नाही’ असा चिमटा केंद्रीय मंत्री नारायण राणे (Central Minister Narayan Rane) यांना काढला आणि ‘मी पुन्हा येईन’ या वाक्याचा संदर्भ देत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांना टोमणा मारला.

सोनई येथील शिवसंवाद कार्यक्रमात (Shiv Samvad program) ते बोलत होते. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या ग्रामीण रुग्णालयात पूर्ण झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन (Inauguration of Oxygen Project) त्यांनी केले. मुळा एज्युकेशन संस्थेच्या विश्रामगृहावर झालेल्या शिवसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोंखडे होते. कार्यक्रमास शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर (Shiv Sena party secretary Milind Narvekar), जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरच्या महापौर रोहिणी शेंडगे, माजी आमदार विजय औटी, शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शाखाप्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवताना खासदार राऊत म्हणाले, नगर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मी पुन्हा येईल असे म्हणणार नाही. मात्र नम्रपणे सांगतो, शिवसेनेच्या भगव्यासाठी नक्कीच पुन्हा पुन्हा येईल. पूरग्रस्त भागाच्या दैार्‍यात मुख्यमंत्र्यांवर टीका (Criticism of CM) करणार्‍या नारायण राणे यांना त्यांची ओळख ‘शिवसैनिक’ असल्याचा चिमटा काढला. शिवसेनेचा शिक्का बसलेल्यांनी नारायण राणेंसारख्या कितीही उड्या मारल्या किंवा पक्ष बदलला तरी त्याची ‘शिवसेनेचा’ म्हणूनच ओळख राहते, ही या पक्षाची ताकद आहे असे ते म्हणाले.

शिवसेनेत माज असायलाच हवा. कुणी गुंड मवाली म्हटलं तरी चालेल. वाघासारखं जन्माला आलो. वाघासारखं मरणार, असा बाणा असावा. शंकरराव गडाख सौम्य बोलतात. पण तुम्हीही आता डरकाळी फोडाल. शिवसेना स्टाईलने अधिकार्‍यांकडून कामे करुन घ्या. सत्ता हा मानसिक आधार असतो. भाजपाने कितीही डोके आपटले तरी आमची महाविकास आघाडी भक्कम आहे आणि राहणार. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युवासेना, विद्यार्थी सेना आणि महिला आघाडी भक्कम केली तर शिवसेनेला कुणीच पराभूत करणार नाही, असा कानमंत्र त्यांनी दिला.

जलसंधारण मंत्री गडाख म्हणाले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात शिवसंवाद बैठका घेतल्या असता प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे. मुख्यमंत्र्यांचे कान आणि डोळे म्हणून ओळख असलेल्या खासदार राऊत व सचिव मिलिंद नार्वेकर यांनी हा जिल्हा दत्तक घेतला तर विरोधकांना पळता भुई थोडी करु. पक्षवाढीला अग्रक्रम देत काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार लोंखडे यांनी साईबाबा देवस्थान व शनैश्वर देवस्थानने करोना काळात रुग्णालय सेवा चांगली दिली, असे सांगितले. सूत्रसंचालन राहुल राजळे यांनी केले. आभार भगवान फुलसौंदर यांनी मानले.

तत्पूर्वी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या प्रकल्प उभारणी कार्यक्रमात प्रकल्प वेळेत उभारल्याबद्दल दीपक फर्टीलायझरचे नरेश देशमुख यांचा सत्कार झाला. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर व उपाध्यक्ष विकास बानकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचालन आप्पासाहेब शेटे यांनी केले.

सत्कार टाळला...

कोकणात आलेल्या आपत्तीमुळे खासदार राऊत, सेनेचे सचिव नार्वेकर व मंत्री गडाख यांनी सत्कार टाळला. जिल्ह्यातून आलेल्या कुठल्याही पदाधिकारी यांचे हार, तुरे व स्वीकारता कोकणवासीयांना मदत करण्याचे आवाहन यावेळी नेत्यांनी केले.

शब्दाला जागणारे गडाख

शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी आपली भूमिका तळ्यात-मळ्यात न ठेवता पहिल्या दिवसापासून ते उद्धव ठाकरे यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. नंतर सेनेत प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात शिवसेना वाढवायाची आहे. शंकरराव शांत व संयमी आहेत. त्यांचे बोलणे सौम्य आहे. मात्र लवकरच ते डरकाळी फोडतील, असे खासदार राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com