पतंग उडविणार्‍या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू

पतंग उडविणार्‍या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मकर संक्रातीच्या दिवशी पतंग उडविण्याच्या नादात गच्चीवर असलेल्या लिफ्टचा पत्रा निसटल्याने 22 वर्षीय तरुण तिसर्‍या मजल्यावरुन खाली पडून गंभीर जखमी झाला होता. त्याचेवर नगर येथे उपचार सुरु असताना काल पहाटेच त्याचा मृत्यू झाला.

पतंग उडविणार्‍या ‘त्या’ तरुणाचा अखेर मृत्यू
पतंग उडविताना तिसर्‍या मजल्यावरून पडून 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी

रविवारी मकर संक्रांतीनिमित्त शहरभर सर्वत्र पतंग उडविणार्‍यांची धामधूम सुरू होती. याच धामधूमीमध्ये दुपारच्या वेळेस मोरगेवस्ती भागातही मोठ्या प्रमाणावर तरूण पतंग उडवित होते. सायंकाळी 5 च्या सुमारास भूषण परदेशी हाही त्याच्या मित्रांसमवेत पतंग उडवत होता. या इमारतीच्या गच्चीवर लिफ्ट लावण्यासाठी जागा सोडण्यात आली होती. त्या बोगद्यावर सुरक्षेसाठी पत्रा ठेवण्यात आला होता.

मात्र पतंग उडविण्याच्या नादात त्याचा पाय या पत्र्यावर पडला आणि पत्रा निसटला. भुषण तिसर्‍या मजल्यावरुन थेट खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. खाली असणार्‍या लोकांनी तातडीने त्याला उपचारासाठी शहरातील साखर कामगार रूग्णालयात हलविले. प्रथमोपचार करून तातडीने त्याला उपचारासाठी नगर येथे पाठविले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com