गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद

गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

शुक्रवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील (Thane District) भिवंडी तालुक्यातील पडगा पोलीस ठाण्याच्या (Padga Police Station) हद्दीत गोळीबार (Firing) करून दोघांना जखमी करणार्‍या पोलीस हवालदारास(Police Constable) राहाता तालुक्यातील कोल्हार बसस्थानकात (Kolhar Bus Stand) पकडण्यात आले. बसमधून पळून जात असताना पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी (Shirdi) व लोणी पोलीस (Loni Police) पथकाने शिताफीने ही कारवाई केली. पकडलेल्या आरोपीस ठाणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद
30 ऑक्टोबरला निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी

या पोलीस हवालदाराचे नाव सुरज देवराम ढोकरे असे असून तो मुंबई येथील कलिना हेडक्वार्टरमधील जलद कृती दलाच्या शास्त्रागार विभागात इन्चार्ज आहे. तो मुळचा संगमनेर (Sangamner) तालुक्यातील घारगाव (Ghargav) येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्याने शहापूर भागात स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून आठ राऊंड फायर करीत दोन जणांवर गोळीबार केला. त्यातील एका जणाला सहा गोळ्या लागल्या तर दुसर्‍या व्यक्तीला दोन गोळ्या लागल्या. दोघेही गंभीर जखमी (Injured) आहेत. फायरिंग केल्यानंतर रात्रीपासून हा पोलीस हवालदार ठाण्यातूून फरार झाला. कधी ट्रेन तर कधी बस अशा साधनांमधून तो वेगवेगळ्या ठिकाणी पसार होत होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. त्याचा पाठलाग करीत असताना कोल्हार बसस्थानकात नगर-नाशिक बस (Nagar Nashik Bus) आली. या बसमधून प्रवास करत असताना त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद
डांबरात फसलेला मेंढपाळ बचावला, चार शेळ्यांचा मृत्यू

त्याच्यावर प्रचंड कर्ज झाले होते. तो स्वतःला गोळी (Firing) झाडून घेणार होता परंतु हिम्मत झाली नाही. कर्जाच्या नैराश्यातून त्याने विनाकारण दोघा जणांवर गोळीबार केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे तसेच शिर्डी व लोणी पोलीस पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई केली. अहमदनगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका हॉटेलला तो थांबला होता. तेथून त्याचे फुटेज व कपड्याचे वर्णन पोलिसांना मिळाले. त्याचप्रमाणे गोपनीयरित्या त्याचे फुटेज व लोकेशन पोलिसांना मिळत होते. त्याचा शोध सुरु होता. पाठलाग करत असताना तो बसमध्ये पोलिसांना दिसला. अखेर त्यास कोल्हार बसस्थानकात पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी बस स्थानकासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद
देशातील 20 टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात

तेथून त्यास कोल्हार पोलिस (Kolhar Police Chowki) चौकीवर आणण्यात आले. पाठलाग करीत असलेले ठाणे ग्रामीण अंतर्गत कासारा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. जाधव व पोलिस पथक चौकीमध्ये आले. यानंतर सदर पोलिस हवालदार सुरज ढोकरे यास ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोळीबार करुन पसार झालेला पोलीस हवालदार कोल्हारमध्ये जेरबंद
दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहार प्रकरण : संतप्त ठेवीदारांचे आंदोलन सुरु
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com