शिक्षक पात्रता परीक्षेतील आठ हजार विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी प्रतिबंध

परीक्षा परिषदेची कारवाई
शिक्षक पात्रता परीक्षेतील आठ हजार 
विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी प्रतिबंध

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा घोटाळा गाजल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती गुन्हे दाखल झाले होते. यातील आरोपींना अटक करून कारवाईचे संकेत देण्यात आले होते. अखेर या घोटाळ्यात संबंधित असलेल्या सुमारे सात हजार आठशे उमेदवारांना गैरप्रकार केल्याच्या कारणाखाली प्राप्त परीक्षेतील संपादन रद्द करण्याबरोबर, भविष्यातील कोणत्याही शिक्षक पात्रता परीक्षेला बसता येणार नसल्याची कारवाई परीक्षा परिषदेच्या आयुक्तांच्यावतीने करण्यात आली आहे.

राज्यात बालकांचा मोफत व शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी डी.एड, बी.एड या पदवी व पदविकेसोबतच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या परीक्षेचा निकाल तीन ते चार टक्के च्या आसपास लागत असल्यामुळे अनेकांना पदवी हातात असूनही नोकरी मिळवणे कठीण झाले होते. काही उमेदवार पूर्वीच सेवेत आहेत म्हणून सवलत मिळण्याची अपेक्षा होती.

मात्र केंद्राच्या विद्या प्राधिकरणाने 2013 नंतर सेवेत आलेल्या सर्वच उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण करण्याची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सेवेत असलेल्या सर्व उमेदवारांना टी.ई.टी पास होणे अनिवार्य होते .राज्य सरकारनेही 2020 मध्ये सेवेत असलेल्या मात्र परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या संबंधित उमेदवारांचे वेतन थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या नोकर्‍या जाणार होत्या ही बाब लक्षात घेऊन परीक्षा परिषदेच्या घेण्यात येणार्‍या पात्रता परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या लोकांनी गैरकारभार करण्यासाठी प्रयत्न केले होते.

ही बाब उघड झाल्यानंतर राज्यातील पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्यात सुरुवात केली होती. कंपनीच्या व्यवस्थापकांसोबतच परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यावरती देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास केल्यानंतर संबंधित उमेदवारांवरती कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले होते. गुन्हयाच्या अनुषंगाने परीक्षार्थींची उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता 7880 उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केले असल्याचे समोर आले आहेत. प्रत्यक्षात ते अपात्र असताना त्यांनी गैरप्रकार करून स्वतःच पात्र करून घेतले आहेत. संबंधित उमेदवारांवरती कारवाई करण्यात परीक्षा परिषदेने निर्णय घेतला होता.

याप्रमाणे होणार कारवाई

परिषदेच्या आयुक्तांनी कारवाई करण्याच्या दृष्टीने उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे .त्यानुसार 7500 उमेदवारांच्या गुणांमध्ये फेरफार करून अपात्र असताना देखील अंतरिम व अंतिम निकालांमध्ये सदर उमेदवारांना पात्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांची संपूर्ण संपांदणूक रद्द करण्यात आली असून यापुढे घेण्यात येणार्‍या शिक्षक पात्रता परिस्थिती कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे. तर 293 उमेदवार अंतिम व अंतरिम अपात्र आहेत. त्यामुळे त्यांना परीक्षा परिषदेच्या विहित पद्धतीने प्रमाणपत्र वितरित झालेले नाहीत. त्यांनी बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे.अथवा तसा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील सदर परीक्षेतील संपादन रद्द करण्याबरोबर पुढील शिक्षक पात्रता परीक्षे साठी कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यात आला आहे .तर 87 उमेदवार हे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींकडून तपासा दरम्या मिळालेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलीस स्टेशन यांनी निश्चित केले आहेत त्यावर देखील संपादन रद्द करण्याबरोबर परीक्षेत कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याची कारवाई करण्यात आली आहे. दोन उमेदवार हे परीक्षेसाठी नोंदणी झालेले नाहीत .त्यांची माहिती परीक्षेच्या कोणत्याही माहितीशी जुळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तर सहा विद्यार्थी हे दुबार आहेत.

आठ हजार विद्यार्थ्यांचे भविष्य संपले

परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरप्रकार करून पात्रता परीक्षेतील उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न केलेला राज्यातील सुमारे 7880 उमेदवार यांचे मागील परीक्षेतील संपादन रद्द करण्यात आले आहे.त्याचबरोबर या उमेदवारांना भविष्यात कोणत्याही प्रकारे पात्रता परीक्षेला बसण्याची अनुमती देण्यात येणार नाही असा निर्णय घेण्यात आल्यामुळे या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत सरकारी सेवेत शिक्षक म्हणून काम करता येणार नाही. पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसल्यामुळे कोणत्याही शाळेत नियुक्तीची संधी उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य आता अंधारमय होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com