डेरेंच्या घराची तीन तास झडती

डेरेंच्या घराची तीन तास झडती

टीईटी घोटाळा : कृषीसेवक पदभरती गैरप्रकारातही सहभाग?

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

राज्यात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळ्यातील आरोपी संगमनेर येथील रहिवासी सुखदेव डेरे यांच्या संगमनेर येथील ‘सुखमय’ या निवासस्थानाची काल तब्बल तीन तास झाडाझडती घेण्यात आली. महत्वपूर्ण माहिती तपासी अधिकार्‍यांच्या हाती लागली असून त्यांनी दोन लाखांची रक्कम हस्तगत केल्याची प्राथमिक माहिती आहे.

पुणे येथील सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कदिर देशमुख यांच्या पथकाने महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तात्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्या ‘सुखमय’ निवासाची काल तपासणी केली. टीईटी पेपरफुटी नंतर आता कृषी सेवक पदभरती घोटाळ्याचे धागेदोरे देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे तत्कालीन संचालक सुखदेव डेरे यांच्यापर्यंत पोहोचले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टीईटी घोटाळ्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. डेरे हे चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले असून ते संगमनेरातील अकोले रोड परिसरातील ‘सुखमय’ या बंगल्यात राहत आहे. 2018 साली झालेल्या टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात डेरे हे आरोपी आहेत. त्यावेळी 500 पेपर मध्ये फेरफार झाल्याचा संशय असून यामध्ये आरोपींनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे उघडकीस येत आहे. या घोटाळ्यात अनेक मोठ्या पदावरील व्यक्तींचा सहभाग उघडकीस येत आहे. डेरे यांच्यामुळे संगमनेरसह नगर जिल्ह्यातील एजंट तपासाच्या रडारवर आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com