3 हजार विद्यार्थ्यांची टीईटीला दांडी

17 हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा : एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल
3 हजार विद्यार्थ्यांची टीईटीला दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरमधील (Nagar) 31 केंद्रावर रविवार (दि.21) रोजी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET) शांततेत पारपडली. दोन सत्रात झालेल्या या परीक्षेला (Exam) 16 हजार 970 विद्यार्थी (Student) हजर होते. तर 3 हजार 149 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. (Student Absent) परीक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त होता. परीक्षार्थीनी परीक्षा (Exam) सुरू होण्यापूवी 20 मिनीट आधीच परीक्षा केंद्रात (Exam Center) दाखल न झालेल्या उमेदवारांना मात्र, परीक्षेला मुकावे लागले. दरम्यान, एसटी बंद (ST Close) असल्याने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले झाले.

टीईटीच्या (TET) सकाळच्या पहिल्या सत्रातील पेपर क्रमांक 1 साठी 8 हजार 688 विद्यार्थी हजर होते. तर 1 हजार 727 विद्यार्थ्यांनी दांडी मारली (Student Absent). तर दुपारच्या सत्रात झालेल्या पेपर क्रमांक दोनसाठी 8 हजार 282 विद्यार्थी हजर होते. या पेपरला 1 हजार 422 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 झोन अधिकारी, 61 केंद्र संचालक, 61 सहायक परीरक्षक, पर्यवेक्षक (प्रति ब्लॉक मागे एक) असे 190 राहणार आहेत.

यासह 843 समावेशक आणि 122 लिपीकांची संख्या आणि 144 शिपाई (Peon) यांनी काम केले, असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पाटील (Education Officer Patil) यांनी दिली. सध्या एसटीचा संप (ST Strike) असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नगर शहरात पोहचतांना धमछाक झाली. अनेकांना येण्यास उशीर झाल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. परीक्षेसाठी ऑनलाईन हजेरी असल्याने वेळनंतर आलेल्या प्रवेश देता येणे शक्य नसल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com