संगमनेर (शहर प्रतिनिधी) -

गेल्या अनेक वेळा तडीपार असणार्या एका गावगुंडाकडून गेल्या काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना त्रास देण्याचे काम

सुरु आहे. त्यामुळे शहरात या गुंडाची दहशत पसरली आहे. पोलिसांनाही न जुमानणारा हा गुंड मारहाणी सोबतच लुटही करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्याचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

या गुंडाने गुरुवारी रात्री एका युवकास मारहाण केली. हा युवक पोलीस ठाण्यात त्याच्या विरुध्द तक्रार करण्यासाठी गेला असता पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्याला बराच वेळ पोलीस ठाण्यात बसून ठेवले. त्यानंतर थातूरमातूर तक्रार दाखल करून आम्ही बघून घेतो असे म्हणत त्या युवकाला घरी काढून दिले.

या गावगुंडाचा पोलीस ठाण्यातही वचक आहे की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दारुच्या नशेत असल्याने माझ्याकडून चुकून काही झाले असेल तर मला माफ करा असेही तो संबंधीतांना फोन करुन सांगतो. या गावगुंडामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर गुंडावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.