<p>नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa</p><p>नगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि लक्झरी गाडीची पहाटे...</p>.<p>दोनच्या सुमारास धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले.</p>.<p>याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या ट्रॅव्हल बसला औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारने नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड फाटा येथे पहाटे दोनच्या सुमारास धडक दिली. या अपघातामध्ये स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले आहेत. या अपघातातील मयत इसम जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहे. मयताच्या नातेवाईकांशी संपर्क झाला आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती मात्र आता वाहतुक सुरळीत झाली आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.</p>