
सोनेवाडी | वार्ताहर
कोपरगाव (Kopergoan) तालुक्यातील डाऊच खुर्द (Dauch Khurd) परिसरात झगडे फाटा (Zagade Fhata) कोपरगाव महामार्गावर (Kopergoan Highway) पगारे वस्ती नजीक कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. (Container Accident)
हा अपघात इतका भीषण होता की अॅपे रिक्षा पूर्ण चक्काचुर झाली. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. (Terrible accident in kopergoan)
याबाबत समजलेली माहिती अशी की झगडेफाट्यावरून ॲपे रिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे जात असताना पगारे वस्ती जवळ कोपरगावहुन येत असलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली.
या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून दोन या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वारांना देखील चिरडले आहे ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते..