शिर्डीकरांना विषमुक्त भाज्यांची चव चाखायला मिळणार

शिर्डीकरांना विषमुक्त भाज्यांची चव चाखायला मिळणार

शिर्डी | राजकुमार जाधव

शहरीकरणाच्या वाढत्या रेट्याबरोबर जसा परसबाग हा शब्द अडगळीत जात आहे तसा एक नवीन शब्दही वापरत येत आहे, तो म्हणजे टेरेस गार्डन (Terrace Garden) किंवा गच्चीवरील बाग.

टेरेस गार्डन हा शब्द आणि संकल्पना म्हणून आज बर्‍यापैकी सर्वांनाच ओळखीचा झाला असून रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या शिर्डी शहरात ‘ग्रिन एन क्लिन’ शिर्डी (Green n Clean Shirdi) या संस्थेच्या माध्यमातून सेंद्रिय पध्दतीने (Organically) टेरेस गार्डनची संकल्पना आचरणात आणून विषमुक्त शेती घरोघरी फुलवली असून विषमुक्त भाज्यांची चव चाखायला मिळत आहे.

शिर्डीकरांना विषमुक्त भाज्यांची चव चाखायला मिळणार
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

शिर्डी शहरात ग्रीन एन क्लीन शिर्डी संस्थेच्या माध्यमातून स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डीचा नारा लावत मुहुर्तमेढ रोवणारी पहिली संस्था ठरली असून आता त्यापाठोपाठ टेरेस गार्डनची संकल्पना रुजवून विषमुक्त भाजीपाला हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये भाजीपाला, फळे, फुले यांची मोठ्या प्रमाणावर विविधता बघायला मिळत आहे. गांडूळ खत, जिवामृत निर्मिती, पर्जन्य जलसंचय आदी प्रयोगांच्या आधारे उत्पादीत केलेल्या विषमुक्त अन्नाचा आनंद ग्रिन एन क्लिनचे सदस्यांबरोबरच शहरातील डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यावसायिक मंडळी घेतांना दिसून येत आहे.

टेरेस गार्डन किंवा गच्चीवरील बाग हा शब्द आणि संकल्पना म्हणून आज बर्‍यापैकी सर्वांनाच ओळखीची झाली आहे. मोठमोठ्या शहरातील प्रत्येक नगरामध्ये गच्चीवरील शेती करणारे अनेक लोकांचा वेगवेगळ्या नावाने अस्तित्वात आहे. हे गट टेरेस गार्डन शेती करणार्‍यांंसाठी खुप सक्रियपणे मार्गदर्शन करतात. महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यात याचे प्रमाण जास्त आहे. त्यापाठोपाठ पुणे, मुंबई, नाशिक, नगर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आदी शहरांमध्ये टेरेस गार्डनची संकल्पना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मात्र या सर्व ठिकाणांपेक्षा आंतरराष्ट्रीय शिर्डी शहरात विषमुक्त भाजीपाला हा प्रयोग ग्रीन एन क्लिन शिर्डी संस्थेने अंमलात आणला असून त्याचे महत्त्व शिर्डी शहराबरोबरच परिसरातील नागरिकांना पटवून देत आहे. त्यामुळे आता शिर्डीकरांनी आपल्या बंगल्यातील गच्चीवरील शेती हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.

दिवसाची सुरुवात आपण जितकी हिरवळ पाहतो तितका आपला दिवस चांगला, आनंदी जातो हे अनेक संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे घरी गॅलरीत किंवा गच्चीवर फुलझाडे व भाजीपाला यांची बाग करण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून जितेंद्र शेळके, अजित पारख, मनीलाल पटेल, प्रसन्न शिरगावकर, दादासाहेब काळे, श्री. गायकवाड, डॉ. जगताप आदींनी केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनास शिर्डीकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून टेरेस गार्डनवर भाजीपाला फुलवणार्‍यांची संख्या वाढली आहे.

गच्चीवरील शेती म्हणजेच टेरेस गार्डनमध्ये बहुतांश भाजीपाल्याचे प्रमाण जास्त असून यात पालक, शेपू, मेथी, गवार, भेंडी, वांगे, टोमॅटो, कोथिंबीर, मुळा, पुदिना, कोबी, फ्लॉवर आदीसह कुंडीत फळरोपे लागवड करण्यात आली आहे. विषमुक्त टेरेस गार्डनसाठी भाजीपाला उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यासाठी बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्रातील कृषी संशोधक डॉ. भरत दवंगे हे प्रत्येक आठवड्यात भेट देऊन विनामूल्य सेवा व मार्गदर्शन करत आहे. त्यामुळे शिर्डीत विषमुक्त भाजीपाल्याची चव आता सर्वसामान्यांसह श्रीमंतांना देखील चाखायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com