अटी आणि शर्तीवर समाजवादी पार्टीने उपोषण सोडले

अटी आणि शर्तीवर समाजवादी पार्टीने उपोषण सोडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगर पालिकेकडून ठेकेदाराला दर महिन्याला 30 लाख रुपये देऊनही शहरातील घाण-कचरा रोजच्या रोज व्यवस्थित साफ होत नसल्याने या घाण-कचर्‍यामुळे डासांचा प्रचंड प्रमाणात प्रादूर्भाव वाढला असून शहरात संभाव्य डेंग्यू, मलेरिया, टायफाईड,फ्ल्यू, चिकनगुनिया अशा स्वरुपाच्या साथीच्या आजारांची साथ फैलाऊ पहात आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांच्याच हस्ते समाजवादी पार्टीने सुरू केलेले उपोषण काल पाचव्या दिवशी काही अटी शर्तींवर मागे घेतले.

समाजवादी पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दि. 30 सप्टेंबर 2021 पासून नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला चार दिवस उलटून गेले तरी नगर पालिका प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होताना दिसून येत नव्हती. सदरील उपोषणास विविध पक्ष, सामाजिक संघटनांचा पाठिंबा वाढत असल्याने उपोषणाच्या पाचव्या दिवशी सोमवार दि. 04 ऑक्टोबर 2021 रोजी संविधान बचाव समितीने नगर पालिकेस टाळे ठोको आणि रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

यावेळी अहमदभाई जहागीरदार, उपनगराध्यक्ष करण ससाणे, नगरसेवक संजय फंड, नागेश सावंत, अनिल कांबळे, तिलक डूंगरवाल, संजय छल्लारे, श्रीनिवास बिहाणी, अनंत पटेकर, शौकतभाई शेख, दिलीप नागरे, मुन्ना पठाण, आदील मखदूमी, रियाजखान पठाण, चरण त्रिभवन, शाहिद कुरैशी, फिरोज पठाण, हुजैफ जमादार, तौफीक शेख, हानिफ पठाण, जावेद कुरैशी,आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण, अभिषेक सोनवणे, एजाज दारूवाला, अरबाज कुरैशी, जकरिया सैय्यद, इमरान शेख, मुबसशिर पठाण, अन्वर तांबोळी, फैज़ान सैय्यद, अमन इनामदार, नदीम तांबोळी, जाविद तांबोळी, सादिक शाह, साद पठाण, गुफरान सैय्यद, अदनान कुरैशी, रिजवान बागवान, मकसूद मिर्जा, जहीर जमादार, कय्यूम पठाण, जावेद कुरेशी, गुड्डू जमादार, अल्तमश शेख, जुबेर शाह, अफज़ल शाह, रेहान शेख, अरबाज़ बेग, नदीम तांबोळी, शहेजाद शेख, राझीक शेख, जीशान सैय्यद, शकील शेख, सोहेल शेख, अय्युब जमादार, अरबाज़ देशमुख, बूंदी कुरैशी, मोसिन शाह, जफर कुरैशी,़ जैद जमादार, समीर शेख, आरिफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com