दहावीत मुलीचं हुश्शार !

जिल्ह्याचा निकाल 96.24 टक्के
निकाल
निकाल

अहमदनगर (प्रतिनिधी)

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर झाला आहे.

यात नगर जिल्ह्याचा निकाल हा 96.24 टक्के लागला असून दहावीसाठी जिल्ह्यातून 71 हजार 101 नोंदणी केली होती. यातील 70 हजार 447 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर 67 हजार 800 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात मुलींनी बाजी मारली आहे. जिल्ह्यात 29 हजाार 511 मुली दहावीत पास झाल्या असून त्याची टक्केवारी 97.66 टक्के असून 38 हजार 289 मुले पास झालेली असून त्यांची टक्केवारी ही 95.17 टक्के आहे.

यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती. जिल्ह्यात पहिल्यांदा परीक्षा देणार्‍यांची निकालाची टक्केवारी 96.58 टक्के असून यात 69 हजार 505 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

यातील 68 हजार 901 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात विशेष प्रविण्यासह 28 हजार 875 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 25 हजार 22, व्दितीय श्रेणीत 11 हजार 170 आणि पास श्रेणीत 1 हजार 982 विद्यार्थी आहेत. तर पुर्नपरीक्षार्थीमध्ये 1 हजार 596 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून 1 हजार 546 विद्यार्थी परीक्षेला बसले यात 32 विद्यार्थी विशेष प्रविण्य, प्रथम श्रेणीत 228, द्वितीय श्रेणीत 145 आणि पास श्रेणीत 846 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुर्नपरीर्थींचा निकाल हा 80.91 टक्के लागला आहे.

नगर तालुका आणि शहरातील शंभर नंबरी

अहमदनगर बॉईज स्कूल, क्लेरा बु्रस स्कूल, भाई सथ्था नाईट स्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय अकोळनेर, राष्ट्रीय पाठशाळा विद्यालय, लक्ष्मीबाई भाऊरा कन्यामंदिर, पंडीत नेहरू विद्यालय, एस.ए. विलीयम हायस्कूल, सद्गुरू विद्यालय मेहकरी, श्रीराम विद्यालय राळेगण, अंबिका विद्यालय केडगाव, कामरगाव इंग्लिश स्कूल, न्य इंग्लिश स्कूल भिंगार, विवेकानंद स्कूल तारकपूर, अहमदनगर पब्लीक स्कूल सावेडी, महाराणी ताराबाई विद्यालय केडगाव, न्यू इंग्लिश स्कूल देऊळगाव सिध्दी, स्वीमी विवेकानंद विद्यालय गुणवडी, ज्ञानदिप विद्यालय वाळुंज, वकरा विद्यालय अरणगाव, न्यू इंग्लिश स्कूल वाकोडी, रेणुकामाता विद्यालय निबोडी, काका म्हस्क विद्यालय मांडवे, श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल नगर, नवनाथ विद्यालय निमागाव वाघा, जगदंबा विद्यालय शिराढोण, जी.एस. पी माध्यमिक विद्यालय खारेकरजुने, मेहर इंग्लिश स्कूल, जिजा माता विद्यालय, भैरवनाथ विद्यालय आगडगाव, दादासाहेब रुपवते ज्युनिअर कॉलेज, रेणुका इंग्लिश स्कूल, सनराईज स्कूल, स्नेहालय माध्यमिक विद्यालय, श्री साई इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, भाग्योदय विद्यालय भोईरे पठार, न्यू इंग्लिश स्कूल शिंगावे नाईक, श्री आर. इंग्लिश स्कूल भवानीनगर, ज्ञानगंगा विद्यालय विळद, अहमदनगर हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय नागापूर, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय मुकूंदनगर, ज्ञानदिप विद्यालय सोनेवाडी, दादा पाटील शेळके विद्यालय निमगाव घाणा, यशवंत माध्यमिक विद्यालय हिवरेबाजार, आनंद माध्यमिक विद्यालय हिवेरबाजार, आनंद विद्यालय नगर, जय बजरंग विद्यालय नगर, कौडेश्वर विद्यालय कौडगाव, दामोधर विधाते विद्यालय सारसनगर, डिवाईन ग्रेस हायस्कूल दौंड रोड, एकता माध्यमिक विद्यालय, अल्ताप माध्यमिक विद्यालय, डॉन बॉस्को विद्यालय, जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय, लिटील वंडर स्कूल नगर, पब्लिक स्कूल वांळुज, नूतन माध्यमिक विद्यालय भिंगार, प्रज्ञाशिल विद्यालय भिंगार, पी.ए. इमानदार विद्यालय गोविंदपूरा, एस.एस. मोहिते विद्यालय भूषणनगर, ज्ञानोदय विद्यालय राजंणी, भोरवाडी विद्यालय भोरवाडी, संत लक्ष्मण महाराज विद्यालय कवडगाव, कन्या विद्यायलय जेऊर, आदर्श विद्यालय नगर यांचा समावेश आहे.

गुणपडताळणी

विद्यार्थ्यांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकर व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत किंवा शाळांमार्फत अर्ज करायचा आहे. गुणपडताळणीसाठी सोमवार 20 जून ते बुधवार 29 जूनपर्यंत अर्ज करायचा आहे. छायाप्रतीसाठी सोमवार 20 जून ते शनिवार 9 जुलैपर्यंत अर्ज करायचा आहे. शुल्कही ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com