नेवाशात रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव

पोलीस हवालदाराला धक्काबुक्की; दोन्ही बाजूच्या लोकांवर गोंधळ घालून दहशत निर्माण केल्याचा गुन्हा दाखल
नेवाशात रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव

नेवासा (तालुका वार्ताहर)

नेवासा (Newasa) शहरात रामनवमीच्या (Ram Navmi) पूर्वसंध्येला निघालेल्या मिरवणुकीदरम्यान काही तरुण झेंडा फडकवत असल्याने समोरासमोर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीला गालबोट लागले असल्याने राम भक्तांमधून संताप व्यक्त केला गेला. काही वेळानंतर पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला

सदरील प्रकाराबाबत पोलीस हवालदार तुळशिराम भानुदास गिते (वय ५१) यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की दि. ९ रोजी नेवासा शहरात शोभा यात्रेमध्ये रात्री १००० ते १२०० लोक हजर होते व डिजे लावण्यात आलेला होता. सदर शोभायात्रेबाबत आयोजक मनोज पारखे यांना शोभायात्रेची परवानगी घेतली किंवा कसे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले,

नेवाशात रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव
७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

सदर शोभायात्रेचे आयोजक अंकुश पंढरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप इ. असल्याचे सांगितले. सदर शोभायात्रेमध्ये स्थावरती प्रभू रामचंद्राचा फोटो लावण्यात आलेला होता. शोभायात्रा एसटी स्टॅण्ड येथून खोलेश्वर गणपतीकडे घेवून जात असताना रस्त्याच्या उत्तरेकडीलबाजूस असलेल्या किस्मत टी व ज्युस या दुकानासमोरील रस्त्यावर काही मुस्लीम तरुण हातामध्ये हिरव्या रंगाचे कापड बांबूला बांधून जोरजोराने हालवत होते. ते पाहुन शोभायात्रेतील हिंदू तरुण त्यांचेकडे धावत जाऊन वाद घालू लागले तेवढ्यात मी व इतर स्टाफ तेथे पोहचलो. झेंडा घेतलेल्या मुलांना मी ओळखले. ते रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार हे होते.

आम्ही त्या मुलांचे हातातून झेंडा काढून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मला धक्काबुक्की केली म्हणून मी माझे मोबाईलमधून त्यांचे चित्रण करीत असताना त्या तरुणांपैकी रेहान शेख याने माझा मोबाईल हिसकावून घेऊन मोबाईल फोडून नुकसान केले व माझे सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केला. त्यानंतर ते सर्वजण तो झेंडा घेऊन तेथून पळून गेले. त्यावेळी मला समजले की जमावातील कोणीतरी अल्ताफ ख्वाजा बागवान (वय १५) रा. लक्ष्मीनगर नेवासा यास कोणीतरी काहीतरी डोक्यात मारुन जखमी केले असून त्यास काही लोक परस्पर दवाखान्यात घेऊन गेले आहेत. त्यावेळी तेथे जमलेल्या लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर जोरदार गोंधळ करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दुकानादारांनी आपआपली दुकाने भितीने बंद केली.

नेवाशात रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव
मानोरी येथील सदरद्दिन बाबा यात्रा उत्सवात राडा

त्याचवेळी रस्त्यावरून येणारी जाणारी वाहने व रस्त्यावरील लोक यांचेमध्ये प्रचंड पळापळ झाली त्यानंतर पोलिसांनी जमलेल्या जमावाला तेथून पांगवले

आयोजक मनोज पारखे, अंकुश पंढुरे, कृष्णा डहाळे, संतोष कुटे, नितीन जगताप यांनी विनापरवाना श्रीरामनवमी निमित्त शोभायात्रा काढून त्यामध्ये डीजे लावण्यात आला तसेच इसम नामे रेहान शेख, फजल शेख, सोहेब पटेल, इमरान जमीर शेख, सद्धाम जमीर शेख, सलमान जमीर शेख, साहील जहागिरदार व इमरान आत्तार यांनी गैरकायदयाची मंडळी जमवून हिरव्या रंगाचा झेडा फडकावून सार्वजनीक रस्त्यावर हिंदू समाजातील तरुणाबरोबर वाद निर्माण केला व मी सरकारी कर्तव्य करत असताना माझे बरोबर वाद घालून धक्काबुक्की केली तसेच माझा मोबाईल फोडून नुकसान केले आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणला तसेच हिंदू समाजातील ओंकार जोशी, दीपक परदेशी, कष्णा डहाळे, बाळासाहेब कोकणे व इतर ६० ते ७० लोकांनी सार्वजनीक रस्त्यावर गोंधळ करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला

नेवाशात रामनवमीच्या पूर्वसंध्येला मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद झाल्याने तणाव
बॉलिवूडमध्ये लग्नाचा सिझन.. रणबीर-आलिया लवकरच अडकणार लग्नबंधनात, तारीख ठरली?

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३५३, ३२४, १४३, १४७, १४९, ४२७, ३२३, १८८ सह क्रिमीनल अमनमेंट अॅक्ट कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करत आहेत. सदरील घटनेनंतर शहरात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्यात ठाण मांडून आहेत.

Related Stories

No stories found.