सात एकरमधील लिंबांवर चोरट्यांचा डल्ला!

दहा ते बारा लाखाची लिंबू चोरी
सात एकरमधील लिंबांवर चोरट्यांचा डल्ला!
File Photo

श्रीगोंदा | प्रतिनिधी | Shrigonda

सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदा शहरातील औटीवाडीमध्ये घडली आहे.

शहरातील औटीवाडीमधील तलावाच्या लगत असलेल्या औटी बंधू यांच्या सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी रात्रीच्या सुमाराला काठ्याच्या साह्याने झोडून हे लिंब घेऊन पोबारा केला. सध्या लिंबू एक किलोला सत्तर ते शंभर रुपयेपर्यंत भाव असताना ऐन हंगामात ही चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे साधारणपणे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे

माजी नगरसेवक दादासाहेब औटी तसेच त्यांचे बंधू प्रदीप औटी आणि अरुण औटी या तिघांच्या बागेतील लिंबू चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत सकाळी शेतात गेल्यावर त्यांना हे लक्षात आले. दुपारी पोलीस स्टेशनला येऊन याबाबत फिर्याद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच तालुक्यातील लिंबू व्यापाऱ्यांकडे हिरवे लिंबू जास्त प्रमाणत विक्रीसाठी आले तर श्रीगोंदा पोलीस स्टेशनला माहिती द्यावी असे आवाहन माजी नगरसेवक दादासाहेब औटी यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com