चिंचोलीत दहा दिवसांचा लॉकडाऊन

चिंचोलीत दहा दिवसांचा लॉकडाऊन

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील चिंचोली येथे करोना बाधितांची संख्या वाढत आहे. या महामारीत रुग्ण दगावण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर स्थानिक ग्रामसुरक्षा समितीने 10 दिवस कडकडीत जनता सचारबंदी पाळण्याचा निर्णय घेतला असल्याचे या समितीने घेतला आहे. दरम्यान गुरुवारी सायंकाळी आणखी दोन रुग्ण दगावले असल्याचे आढळून आले आहे.

शहरी भागातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनाने ग्रामीण भागात आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली असल्याचे सध्या चित्र पहावयास मिळत आहे. चिंचोलीतील तांभेरे रस्ता परिसरातील बाधितांची संख्या पाहता गुहा आरोग्य केंद्राचे अधिकारी रुग्णतपासणीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न करतात. दरम्यान, गावातील औषध दुकाने व दवाखाने वगळता बंद पाळण्यात येणार असून उल्लंघन करणाराचे दुकान सील करण्यात येणार असल्याचे समितीने सांगितले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com