वाळू वाहतुकीचा टेम्पो पकडल्याने तलाठी व कोतवालास मारहाण

नेवासा तालुक्यातील चिंचबनची घटना
वाळू वाहतुकीचा टेम्पो पकडल्याने तलाठी व कोतवालास मारहाण

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

विनापरवाना वाळू वाहतूक (Unlicensed sand transport) करणारा टेम्पो पकडल्याच्या कारणावरुन तलाठ्यास (Talathi) शिवीगाळ, धक्काबुक्की करुन हातपाय तोडण्याची धमकी (Threat) दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील (Newasa) चिंचबन (Chichban) शिवारात घडली असून याबाबत फिर्यादीवरुन गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

याबाबत खुपटी येथील कामगार तलाठी गणेश आप्पासाहेब घुमरे (वय 32) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 10 ऑगस्ट रोजी हाटे पाच वाजण्याच्या सुमारास चिंचबन ते नेवासा रोडवर (Chinchban to Nevasa Road) असलेल्या गणेश शिंदे यांचे वस्तीजवळ दत्तात्रय आसाराम हिवरे रा. नेवासा खुर्द व त्याचे दोन अनोळखी साथीदार व टेम्पो चालक (नाव गाव माहित नाही) यांनी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांचा वाळू वाहतूक करणारा टेम्पो का पकडला? या कारणावरुन मला व माझे सोबत असणारे कोतवाल (Kotwal) बाळासाहेब सुखदेव चौधरी असे आम्हास शिवीगाळ करुन धक्काबुक्की करत तुमचे आम्ही आता हातपाय मोडून टाकू अशी धमकी (Threat) देवून पकडलेला बिगर नंबर आयशर टेम्पो यामध्ये दोन ब्रास वाळूसह चोरी (Theft) करुन घेवून पळून गेले.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) भारतीय दंड विधान कलम 353, 332, 504, 506, 379, पर्यावरण संरक्षण अधिनियम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपनिरीक्षक समाधान भटेवाल करत आहेत.

तलाठी संघटनेचा ‘काम बंद’चा इशारा

दरम्यान तलाठी गणेश घुमरे यांना केलेली शिवीगाळ व धक्काबुक्कीचा नेवासा तालुका तलाठी संघटनेने निषेध केला आहे. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास तालुका तलाठी व कोतवाल संघटना 13 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी कारवाई करताना शासकीय वाहन व दोन शस्त्रधारी पोलीस दिले जावेत अशी मागणीही निवेदनात केली आहे. जिल्हा तलाठी संघ उपविभागीय अध्यक्ष सोपान गायकवाड, तालुका अध्यक्ष अनिल गव्हाणे, बद्रीनाथ कमानदार आदींसह तालुक्यातील तलाठी व कोतवाल उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com