मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक

मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

तालुक्याच्या पठारभागातील पिंपळगाव देपा (Pimpalgav Depa) येथील जय मल्हार घाटात मालवाहतूक टेम्पोला भीषण आग (Tempo Fire) लागल्याची घटना शनिवार दिनांक 14 जानेवारी दुपारी दोन ते आडीच दरम्यान घडली आहे. त्यामुळे आगीत टेम्पो जळून खाक झाला आहे.

मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक
Maharahstra Kesari 2023 : शिवराज राक्षे यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'

मालवाहतूक टेम्पो (क्रमांक एम एच. 17, बी वाय. 6789) हा जय मल्हार घाटातून पिंपळगाव देपा (Pimpalgav Depa) गावाकडे येत होता. शनिवारी दुपारी घाट चढून टेम्पो वर आला असता त्याचवेळी टेम्पोला अचानक भीषण आग (Fire) लागली आणि या आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता टेम्पोचे आगीत मोठे नुकसान (Loss) झाले आहे. टेम्पोला आग लागल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक
वांबोरीत कांद्याला जास्तीत जास्त मिळाला 'हा' भाव

त्यानंतर संगमनेर नगरपालिकेचा (Sangamner Municipality) अग्नीशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला आणि आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी नागरिकांनीही मोठे सहकार्य केले आहे. ही आग कशाने लागली हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर (Pune Nashik Highway) असे प्रकार वारंवार पाहावयास मिळत असतात. मात्र आता इतर ग्रामीण भागातील रस्त्यांवरही असे प्रकार घडू लागले आहेत.

मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक
एएमटी बसच्या धडकेत जखमी झालेल्या ‘त्या’ तरुणीचा मृत्यू
मालवाहतूक टेम्पो भीषण आगीत खाक
उत्साही पतंगबाजीचा संडे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com