महामार्गावर टेम्पो चालकास मारहाण करत लूटणारे तिघे जेरबंद

महामार्गावर टेम्पो चालकास मारहाण करत लूटणारे तिघे जेरबंद

पारनेर |तालुका प्रतिनिधी|Parner

अहमदनगर-पुणे महामार्गावर (Ahmednagar Pune Highway) गाडीला कट मारल्याचा बहाणा करून टेम्पो चालकास मारहाण (Tempo Driver Beating) करत त्याची 8 हजाराची लूट करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.16) रात्री जातेगाव शिवारात घडली. या प्रकरणी सुपा पोलीसांनी (Supa Police) तातडीने हालचाल करत तिघांना अटक (Arrested) केली आहे.

विशाल बनकर (रा. देवदैठण, ता. श्रीागोंदा), सुमित साठे व वैभव फडके (दोघे रा. पाडळी रांजणगाव, ता. पारनेर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. टेम्पो चालक बापु नामदेव जगताप (रा. वाळुंज औद्योगिक वसाहत, संभाजीनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार ते टेम्पो नगरच्या दिशेने घेऊन जात असताना दुचाकीवर आलेल तीन अनोळखी व्यक्तींनी गाडी आडवी लावून आमच्या गाडीला कट मारल्याचा बहाणा केला.

तसेच गाडीत घुसून मारहाण (Beating) करत त्यांच्याकडील 8 हजार रूपयांचे रोकड घेऊन ते पळून गेले. या प्रकरणी अज्ञात तिघांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात (Supa Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक पठाण करत आहेत. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com