नवरात्रोत्सवात दैनंदिन 5 हजार भाविकांना दर्शन

जिल्हाधिकार्‍यांचेे आदेश : परिसरात जमावबंदी
नवरात्रोत्सवात दैनंदिन 5 हजार भाविकांना दर्शन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात आजपासून मंदिरे खुली (Temples open in the district from today) होत असून नवरात्रौत्सवालाही (Navratri Festival) सुरूवात झाली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर (Covid 19) जिल्ह्यात 7 ते 20 ऑक्टोबरपर्यंत जमावबंदीचा आदेश (Curfew order) जिल्हा प्रशासनाने लागू केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी बुधवारी रात्री उशिरा आदेश काढला. तसेच मंदिरांच्या व्यवस्थापन समितीला ऑनलाईन पासद्वारे प्रतिदिन पाच हजार भाविकांना दर्शनाला परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळांभोवती यात्रा भरवण्यास मनाई करण्यात आली आहे.

पाथर्डी (Pathardi) येथील जगदंबा देवी मंदिर, कर्जतच्या (Karjat) राशीनमधील (Rashin) जगदंबा देवी मंदिर, केडगावमधील (Kedgav) रेणुका माता देवी मंदिर, एमआयडीसीमधील (MIDC) रेणुका माता मंदिर, पाईपलाईन रोडवरील (Pipeline Road) रेणुकामाता मंदिर आणि नगर तालुक्यातील बुर्हाणनगर (Burhanagar) येथील तुळजा भवानी माता मंदिर परिसरात जमावबंदी आदेशाचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना या आदेशाद्वारे दिल्या आहेत. धार्मिक स्थळांभोवती यात्रा भरण्यास मनाई असणार आहे. याशिवाय हॉटेल, स्टॉल, खेळणी दुकाने, प्रसाद विक्रीची दुकाने, हार, फुले, नारळ विक्रीची दुकाने, उपहारगृहे, मनोरंजन साधनांची दुकाने, लावण्यास बंदी घालण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांमधील अत्यावश्यक सेवेतील कार्यरत अधिकारी व कर्मचारी, जीवनावश्यक वस्तू व सेवेबरोबरच पूर्वापार परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव, समारंभ, नित्योपचार याबाबत स्थानिक परिस्थितीनुसार परवानगीचे अधिकारी जिल्हा प्रशासनाने राखून ठेवले आहेत.

अन्यथा कारवाई

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली धार्मिक स्थळे गुरूवारपासून भाविकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र, धार्मिक स्थळांवर दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये, तसेच करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्याच अनुषंगाने दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांसोबतच धार्मिक स्थळासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमांचे पालन न केल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.