मंदिर जिर्णोद्धार करताना आढळले प्राचिन मुर्तींचे अवशेष

मिरीतल्या कानिफनाथ मंदिरातील प्रकार
मंदिर जिर्णोद्धार करताना आढळले प्राचिन मुर्तींचे अवशेष

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील चैतन्य कानिफनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना बुधवारी (दि.21) दुपारच्या सुमारास या ठिकाणी काही प्राचीन काळातील देवांच्या दगडी मूर्तींचे अवशेष आढळून आले आहेत. या मूर्ती पाहण्यासाठी गावातून ग्रामस्थांची मंदिर परिसराकडे गर्दी वाढली आहे.

मिरी येथे चैतन्य कानिफनाथांचे पुरातन काळातील मंदिर आहे परंतु याच मंदिर परिसरात मुस्लिम समाज बांधवांचा दर्गा असल्याचेही मुस्लिम समाज बांधवांचे म्हणणे असल्यामुळे याठिकाणी काही दिवसांपूर्वी जे नव्याने ट्रस्ट स्थापन झाले आहे त्यामध्ये देखील हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील व्यक्तींना विश्वस्त म्हणून स्थान देण्यात आलेले आहे. परंतु ग्रामस्थ व कान्होबा देवस्थान ट्रस्टच्यावतीने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे नियोजन झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून पुरातन मंदिर पाडून त्याठिकाणी नवीन मंदिर उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

पुरातन मंदिराच्या भिंती व इतर बांधकाम हटवण्याचे काम सुरू असतानाच आज दुपारी या ठिकाणी प्राचीन काळातील हिंदू देवांच्या काही मूर्ती आढळून आल्या आहेत. या मूर्ती पाहण्यासाठी दुपारपासून कानिफनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. याठिकाणी आणखी खोदकाम केल्यानंतर मूर्तीसह पुरातन मंदिर देखील असावे अशी भाविकांची भावना असून पुढील खोदकामा संदर्भात ग्रामस्थांसह भाविकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

कान्होबा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले असून पूर्वीची चार फूट रुंदीची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना त्या भिंतीमध्ये दोन दगडी मूर्ती आढळून आल्या असून यामध्ये एक मूर्ती विष्णूची असावी असा अंदाज आहे. यासंदर्भात पुरातत्व विभागाला माहिती देण्यात आली आहे.

- अशोक झाडे, अध्यक्ष कान्होबा देवस्थान समिती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com