
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील विविध ठिकाणच्या मंदिरांतील दानपेट्या फोडणारी टोळी (Temple Donation Box Breaking Gang) कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याच्या (Kopargav Police Station) पथकाने जेरबंद केली. तीन जणांना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोळपेवाडी (Kolpewadi) येथील महेश्वर मंदिर, तळेगाव मळे येथील शनैश्वर मंदिर व मायगाव देवी येथील रेणुका माता मंदिरातील दानपेट्या काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी फोडून रोख रक्कम चोरून नेली होती. तीनही ठिकाणच्या चोरीबाबत गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यानंतर चोरट्यांचा शोध कोपरगाव तालुका पोलिस घेत होते.
स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मिळालेल्या माहितीवरून धनंजय प्रकाश काळे (रा. भोजडे चौकी, ता. कोपरगाव), भगवान दिलीप परदेशी (रा. शिर्डी, ता. राहाता) व राहुल केवलसिंग लोदवाल (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांना पोलिसांनी अटक केली. आरोपींनी कोळपेवाडी येथील महेश्वर मंदिरातून चोरलेली 7 हजार 500 रूपयांची रोख रक्कम काढुन दिली आहे. या शिवाय तळेगाव तळे व मायगाव देवी येथील मंदिरातून (Temple) चोरलेले 19 हजार 500 रूपये त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, सहाय्यक फौजदार सुरेश गागरे, पो.हे.कॉ. संदीप बोटे, पो. ना. संतोष लांडे, पो.कॉ. अनिश शेख, पो. कॉ. अंबादास वाघ, पो. कॉ. राघव कोतकर, पो. कॉ. रमेश झडे, पो. कॉ. अमोल फटांगरे, चालक पो. ना. रामा साळुंके यांच्या पथकाने केली आहे.