
घारगाव |वार्ताहर| Ghargav
उन्हाच्या झळा वाढू लागल्याने व बॉयलर कोंबडीच्या अंगी असणारी उष्णता याचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. उष्माघाताने कोंबड्या मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहे. उष्ण वातावरण नियंत्रित करण्यासाठी पोल्ट्री शेडवर ठिबक सिंचन तसेच पाण्याच्या प्लॅस्टीक टाक्यांना बारदान लावून पाणी थंड ठेवण्याचा प्रयत्न पोल्ट्री चालक करत आहे.
सध्या उन्हामुळे कोंबड्यांची मर वाढू लागली असून यावर उपाय म्हणून पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्री शेडवर पाचरट टाकून तसेच त्यावर ठिबकद्वारे पाणी सोडत आहेत. तसेच आजूबाजूने हिरवी नेट बांधून पोल्ट्री शेडमधील वातावरण नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोल्ट्री शेडवरील सिमेंट पत्रे थंड राहतील याची काळजी घेत आहेत.पत्राच्या आतील बाजूनेही तुषार सिंचन केले जात आहे.