तेलकुडगाव येथे दोन कुटूंबांत हाणामारी

परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही बाजूच्या 7 जणांवर गुन्हा दाखल
तेलकुडगाव येथे दोन कुटूंबांत हाणामारी

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

किरकोळ कारणावरुन शेजारच्या दोन कुटूंबात हाणामारी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथे घडली. याबाबत परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दोन्ही बाजूच्या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेषराव लक्ष्मण घोडेचोर (वय 65) धंदा-मजुरी रा. तेलकुडगाव ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब हनुमंत काळे, अक्षय बाळासाहेब काळे व उज्वला बाळासाहेब काळे सर्व रा तेलकुडगाव तालुका नेवासा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले की,

सकाळी 9.20 वाजण्याच्या सुमारास आरोपी मजकूर हे फिर्यादीचे घरासमोर येऊन घरासमोर टाकलेली खाट काढून घ्या असे म्हणून वरील आरोपींनी फिर्यादीस व साक्षीदारास लोखंडी गजाने व दगडाने मारहाण करून वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नं. 227/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार रेवणनाथ दहिफळे करत आहेत.

दुसरी फिर्याद अक्षय बाळासाहेब काळे (वय 27) धंदा-शेती रा. तेलकुडगाव ता. नेवासा यांनी दिली असून त्यावरुन आरोपी अशोक घोडेचोर, सोमनाथ घोडेचोर, शेषराव घोडेचोर व रंजना घोडेचोर सर्व रा-तेलकुडगाव ता. यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीत म्हटले की, सकाळी 10.30 वा सुमारास फिर्यादीच्या राहते घरासमोर फिर्यादी हे आरोपीतांना भिंती लगतचे खराब सामान काढून घ्या असे म्हणाले. त्याचा त्यांना राग आलेने त्यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना लोखंडी पाईप, गज व दगडाने तसेच लाथाबुक्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुहा रजिस्टर फर्स्ट 228/2022 भारतीय दंड विधान कलम 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक बी. आर. कोळपे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com