तेलंगणाच्या मंत्र्यांना शिर्डीतील द्राक्षाचा गोडवा

कृषीमंत्र्यांचा महाराष्ट्रात अभ्यासपूर्वक दौरा
तेलंगणाच्या मंत्र्यांना शिर्डीतील द्राक्षाचा गोडवा

शिर्डी | शहर प्रतिनिधी

देशविदेशात शिर्डीतील (Shirdi) प्रसिध्द पेरूची बाजारपेठ म्हणून माहीती होती, पण प्रत्यक्षात येथील द्राक्षाची शेती पाहुन आपण थक्क झालो आहे. दरम्यान तेलंगणाच्या (Telangana) मंत्र्यांना शिर्डीतील द्राक्षाचा गोडवा लागल्याने येथील द्राक्ष (Grape) उत्पादकांनी देशातील बाजार पेठेबरोबरच युरोपातील (Europe) बाजारपेठेचा अभ्यास करावा असे आवाहन तेलंगणाचे कृषिमंत्री एस. निरंजन रेड्डी (Telangana Agriculture Minister S. Niranjan Reddy) यांनी केले आहे.

तेलंगणाचे कृषीमंत्री एस.निरंजन रेड्डी यांच्यासह ११ आमदारांचा अहमदनगर (Ahmednagar) तसेच जळगाव (Jalgoan) जिल्ह्याच्या दोन दिवसीय अभ्यासपूर्वक दौ-यानिमित्ताने ना.एस.निरंजन रेड्डी शुक्रवारी शिर्डीत आले होते. यावेळी ना.रेड्डी यांच्याबरोबर आलेल्या आमदारांनी शिर्डी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी अरविंद कोते यांच्या फाँर्म हाऊसवर द्राक्ष शेतीची माहीती घेतली.

यावेळी कृषीमंत्री ना.रेड्डी यांनी सांगितले की, देशभरातील प्रख्यात फळउत्पादकांच्या शेतीची माहीती घेण्यासाठी आमचा दौरा असुन अरविंद कोते यांनी द्राक्षे शेतीला आधुनिकतेची जोड़ देवून उच्चत्तम दर्जाची द्राक्षे निर्माण केली आहे. सध्या शेतक-यांना त्यांनी उत्पादीत केलेल्या मालाला शास्वत बाजारपेठ नसल्याने अनेक समश्यांना सामोरे जावे लागते. अलिकडच्या काळात युवक मोठ्या पगाराच्या नोक-या सोडून देत शेती व्यवसायीकडे वळत आहेत.जगातील बाजारपेठांचा ते आभ्यास करत आहेत. आजच्या काळात तरूणांचा शेतीकडील वाढता कल हा शेतीव्यावसायाच्या उर्जीतावस्थेला हातभार लावणारा ठरेल असा विश्वासही मंत्री रेड्डी यांनी व्यक्त केला.

यावेळी अरविंद कोते यांनी मंत्री रेड्डी यांचेसह उपस्थीत ११ आमदारांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जिल्ह्यातील द्राक्ष आणी पेरू फळ बागांविषयी कृषीतज्ञ मधुकर दंडवते, विनायक दंडवते, शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, सदाशिव रोहम यांच्याबरोबर मंत्री रेड्डी यांनी संवाद साधला. यावेळी विनायक कोते, हौसिराम कोते यांच्यासह शिर्डी राहाता येथील शेतकरी मोठ्या संख्याने उपस्थीत होते.

यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप, राहाता तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांनी उपस्थीत कृषीमंत्री आणि आमदारांना नगर जिल्ह्यातील शेती आणी सिंचनाची माहीती दिली.

तेलंगाना राज्यात फळ आणी प्रक्रिया उद्योगाच्या वाढीसाठी आमचा हा शिर्डी दौरा असुन येथील उच्च आणि प्रगत तंत्रज्ञान तेलंगणातील शेतक-यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतीला जोड धंदा म्हणुन दुध उत्पादनातही नगर जिल्ह्याने उच्चांक केला आहे. याचेही अनुकरण तेलंगणात व्हावे यासाठी आपला प्रयत्न राहील.

ना.एस निरंजन रेड्डी (कृषीमंत्री तेलंगाना राज्य)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com