तेलंगणाच्या धर्तीवर कृषी धोरण महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी राबवावे - सावंत

तेलंगणाच्या धर्तीवर कृषी धोरण महाराष्ट्रासह अन्य राज्यांनी राबवावे - सावंत

अकोले |प्रतिनिधी| Akole

तेलंगणा राज्याने अत्यंत कमी कालावधीत मोठा विकास साधला आहे. यामध्ये विशेष करुन शेतकर्‍यांसाठीच्या योजना व कृषी धोरण महाराष्ट्र राज्यासह अन्य राज्यांनी राबवाव्यात असे प्रतिपादन ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी केले. तर तेलंगणा राज्याच्या विकासाचे सर्व श्रेय मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना जाते असे ही ते म्हणाले.

तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत यांना तेलंगणाचे कृषी विकास धोरण व शेतकरी कल्याण योजनांचा अभ्यास व मार्गदर्शन दौर्‍यासाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर ज्येष्ठ नेते सावंत अकोले येथे आल्यानंतर त्यांचा तालुक्याच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँकेच्या सहकार सभागृहातील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे होते. यावेळी परभणीचे माणिकराव कदम, ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, बी. जे. देशमुख, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख, बाजीराव दराडे, अरुण रुपवते, सुरेश खांडगे, प्रा. सहदेव चौधरी, माधव तिटमे, बाळासाहेब वडजे, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, सुरेश गडाख, प्रकाश नवले, राजेन्द्र डावरे, वकील के. बी. हांडे, रावसाहेब वाकचौरे आदी उपस्थीत होते.

श्री. सावंत आपले तेलंगणा दौर्‍याचे अनुभव कथन करताना पुढे म्हणाले, तेलंगणाच्या भुमिवर चंद्रशेखर राव यांच्या रूपाने शेतकर्‍यांसाठी देवदूत च अवतरला असून शेतकर्‍यांना हंगाम पुर्व 10 हजार रुपये दिले जातात तर विज बिल पुर्ण माफ आहे. पाण्यावर कुठला ही कर नाही. शेतकर्‍यांचे पुर्ण कर्ज माफ केले असून आधुनिक शेती शेतकरी करतोय. अत्यंत कमी कालावधीत या राज्याने प्रगती साधली असून कृषी च्या योजना अत्यंत प्रभावी पणे राबविल्या जात असून याचे अनुकरण महाराष्ट्र सरकारने करावे. नव्हे देशातील इतर राज्यांनी ही करावे. पाणी आडविण्याचे काम ही मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकले. शेती वरच सर्व जग चालतय तेव्हा शेतकरी स्वावलंबी झाला पाहिजे. शेतीवर या राज्याच्या मुख्यमंत्री यांची निष्ठा असल्यानेच हे सर्व होऊ शकले, असेही सांगत सावंत शेवटी म्हणाले की आपल्या भागातील तरूणांनी तेलंगाणाची शेती आणि राज्याचा इतर क्षेत्रातला विकास पहायला जावे, असेही ते म्हणाले.

माजी मंत्री मधुकरराव पिचड अध्यक्षीय भाषणात म्हणाले, सावंत यांच्या सारख्या शेतकरी नेत्याची या अभ्यासासाठी निवड होते ही आपल्या अकोल्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची बाब आहे. ज्यांनी आपले संपूर्ण जिवन शेतकर्‍यांसाठी समर्पीत केले. त्यांनी अकोल्याच्या चळवळीत आंदोलनात अग्रभागी रहात विधायक कामासाठी सर्वांना एकत्र केले. भंडारदरा पाण्यासाठी लढा उभारला.हक्काचं पाणी मिळवून दिले त्या आंदोलनात आपण ही सहभागी झालो. आज काही लोकांमुळे फेर वाटपाची चर्चा करीत आहे ते त्यांनी करवून दाखवावे, असेही पिचड यावेळी म्हणाले.

यावेळी निवृत्त अधिकारी बी. जे. देशमुख यांनी प्रारंभी प्रस्तावना केली. तर सूत्रसंचालन शिवाजीराव नेहे यांनी केले. आभार सुरेशराव खांडगे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com