अहमदनगर (प्रतिनिधी) -

भावाला शाळेत सोडून घरी जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एकावर तोफखाना पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड), पोक्सो कलमान्वये

गुन्हा दाखल केला आहे. आकाश रंगनाथ लांडगे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. सावेडी उपनगरात ही घटना घडली.

पीडित मुलगी तिच्या लहान भावाला शाळेत सोडून घरी जात असताना लांडगे याने तिला रस्त्यामध्ये अडवित तिच्याशी गैरवर्तन केले. तू जर माझी झाली नाही, तर मी तुला कोणाची होऊ देणार नाही, असे म्हणत लांडगे याने पीडित मुलीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.