कॉलेज विद्यार्थिनीची छेड काढल्याने एकास बदडले

कॉलेज विद्यार्थिनीची छेड काढल्याने एकास बदडले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढल्याच्या कारणावरून तिच्या नातेवाईकांनी एका तरुणास बदडून काढले. येथील. बोरावके कॉलेजच्या बाहेर काल दुपारी हा प्रकार घडला. सूतगिरणी परिसरातील विद्यार्थिनी कॉलेजला येत असताना वार्ड नं. 2 मधील एका तरुणाने तिची छेड काढली.

यावेळी तिने छेड काढणार्‍या तरुणाच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर तरुणानेही तिला मारहाण केली. त्यामुळे या विद्यार्थिनीने आपले भाऊ आणि नातेवाईकांना बोलावून घेतले. त्यांनी या तरुणास चांगलेच बदडून काढले. याबाबत त्यांनी तक्रार केल्याचे समजते. यावेळी कॉलेज परिससत मोठी गर्दी जमली होती.

दरम्यान, या तरुणानेही आपल्या भागातील साथीदार याठिकाणी बोलावल्याने कॉलेज परिसरात तणावाचे वातावरण झाले. याची माहिती मिळताच पोलीस गाडी कॉलेज परिसरात आली. पोलिसांनी याठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले. याबाबत शहर पोलिसांकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

Related Stories

No stories found.