शिक्षक संघाच्या अधिवेशनाकडे नगर जिल्ह्याची पाठ

जिल्ह्यातून 100 पेक्षा कमी शिक्षक असणार उपस्थित
शिक्षक संघाच्या अधिवेशनाकडे नगर जिल्ह्याची पाठ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे (Maharashtra State Primary Teachers Association) त्रैवार्षिक अधिवेशन 17 आणि 18 मार्च रोजी पनवेल (जि. रायगड) येथे होत आहे. नगर जिल्ह्याने (Ahmednagar District) या अधिवेशनाकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे. आज अखेर अधिकृतरित्या जिल्हा परिषदेत (Zilla Parishad) जमा झालेल्या माहिती प्रमाणे जिल्हाभरातून अवघ्या 95 शिक्षकांनी अधिवेशनाची (Convention by Teachers) रजा (Leave) घेतली आहे. शिक्षक संघावर अशी नामुष्की यापूर्वी कधी ही जिल्ह्यात आली नसल्याचे बोलले जात आहे.

या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार (NCP President MP. Sharad Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक मंत्री उपस्थित राहणार असल्याचा मोठा गाजावाजा केला जात असला तरीही शिक्षकांची या अधिवेशनासाठी जाण्याची कुठलीही तयार नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये संघात गटबाजी वाढीला लागली. बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम चालू असताना जिल्ह्यातील सोनेरी टोळीने संभाजी थोरात यांचे कान भरून बापूसाहेबांची गच्छंती करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी बाळू सालके यांची जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र सालके हे शेअर मार्केटिंगच्या एका प्रकरणात आरोपी झाल्याने सध्या ते परागंदा आहेत. त्यांच्या गैरहजेरीत जिल्ह्यातील सोनेरी टोळीने अधिवेशनाची धुरा सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र जिल्ह्याने त्यांच्याकडे पाठ फिरवली.

या अधिवेशनाच्या निमित्ताने संगमनेर (Sangamner), कोपरगाव (Kopargav), श्रीरामपूर (Shrirampur), नेवासा (Newasa), कर्जत (Karjat) आणि जामखेडमध्ये (Jamkhed) एकही पावती गेली नाही. तर अकोले व पारनेरमध्ये प्रत्येकी एक जण, पाथर्डी, शेवगाव व नगर तालुक्यातून प्रत्येकी चार, राहुरीतून (Rahuri) 10, राहत्यातून (Rahata) 11 आणि श्रीगोंदा (Shrigonda) 60 शिक्षक अधिवेशनासाठी गेल्याचे समजते. नगर जिल्हा हा शिक्षक संघाचा बालेकिल्ला असून यापूर्वी जिल्ह्यातून आठ ते दहा हजार शिक्षक दर वेळी अधिवेशनाला उपस्थित राहत होते. मात्र यावेळी शिक्षक संख्येची शंभरी सुद्धा शिक्षक संघाच्या या नवीन पदाधिकार्‍यांना गाठता आली नाही यावरून शिक्षक समुदायांमध्ये यांची काय प्रतिमा आहे याची प्रचिती येत आहे.

शिक्षक संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच नगर जिल्ह्यातून अधिवेशनासाठी मिळालेला अत्यल्प प्रतिसाद ही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या दृष्टीने अत्यंत नामुष्कीची बाब आहे. राज्याचे सरचिटणीस स्वत:च्या तालुक्यातुन या अधिवेशनासाठी फक्त साठच पावत्या फाडू शकतात. जिल्हाभरातून तर अत्यंत दयनीय अवस्था असल्याने राज्याच्या सरचिटणीस पदावर असलेले स्वयंघोषित नेत्याने नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्य शिक्षक संघाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा द्यावा.

- राजकुमार साळवे, जिल्हाध्यक्ष जिल्हा गुरूमाऊली मंडळ

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com