बदली प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास शिस्तभंगाची कारवाई

बदली प्रक्रियेत चुकीची माहिती दिल्यास शिस्तभंगाची कारवाई

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेत माहिती भरताना जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्यास त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. बदलीच्या ऑनलाईन प्रक्रियेतून देखील संबंधित शिक्षकांना बदली प्रक्रियेत वगळण्याचे आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोन या ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये शिक्षकांनी खोटी आणि चुकीची माहिती सादर केली. त्याआधारे शिक्षकांची बदली झाल्यास पात्रताधारक शिक्षकांवर अन्याय होतो. या बदल्यांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत. पुढील दोन दिवसांत अर्जाची काटेकोरपणे पडताळणी करण्यास शासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. पात्रता नसतानाही खोटी आणि चुकीची माहितीच्या आधारे अर्ज केल्याचे आढळल्यास संबंधित शिक्षकाला त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल.

प्रक्रिया गुरुवारपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. अशा खोट्या व चुकीच्या माहिती आणि प्रमाणपत्राच्या आधारे अर्ज भरल्यास संबंधित शिक्षकाचा अर्ज ऑनलाईन प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. अशा शिक्षकाविरूद्ध शिस्तभंगविषयक कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. आता बदल्यांमध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक आणि दोनमधील बदल्यांसंदर्भात ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची मुदत संपली असल्यामुळे अशा शिक्षकास नव्याने अर्ज भरण्याची मुभा असणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com