पती-पत्नी एकत्रिकरणासाठी 218 गुरूजींचे अर्ज

संवर्ग एकमधून 1 हजार 479 शिक्षक बदलीसाठी इच्छुक
पती-पत्नी एकत्रिकरणासाठी 218 गुरूजींचे अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत संवर्ग एक आणि संवर्ग दोन (पती-पत्नी एकत्रिकरण) याची माहिती ऑनलाईन प्रणालीत नोंदवण्यात आली आहे. आता संवर्ग एक आणि दोनमधून बदलीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून लवकरच बदल्यांसाठी चार प्रकारांतील याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, संवर्ग दोन (पती-पत्नी एकत्रिकरण) साठी 218 शिक्षकांनी ऑनलाईन अर्ज केले असून संवर्ग एकमधून 1 हजार 479 शिक्षक बदलीसाठी इच्छुक आहेत.

येत्या आठ दिवसांत शिक्षकांच्या बदल्यांसाठी बदली पात्र, बदली अधिकार प्राप्त, संवर्ग एक आणि संवर्ग दोन यातील शिक्षकांच्या ऑनलाईन याद्या प्रसिध्द होणार आहेत. ही प्रक्रिया 25 नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर 26 ते 28 नोव्हेंंबर या कालावधीत प्रसिध्द करण्यात आलेल्या याद्यांवर आधी शिक्षणाधिकारी यांच्यासमोर सुनावण्या घेण्यात येणार असून या सुनावणी विरोधात 3 ते 5 डिसेंबर या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपील करता येणार आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी हे 6 ते 8 डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेणार आहे. त्यानंतर खर्‍याअर्थाने बदलीसाठी पात्र ठरण्यार्‍या शिक्षकांची यादी अंतिम होणार आहे.

जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभाग सध्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेत व्यस्त असून किमान महिनाभरात शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com