शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

सहकार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना केली आर्थिक मदत
शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर तालुक्यातील निंबळक येथील परमेश्‍वर मोरे हे श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान, महिनाभरापूर्वी त्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

आपल्या सहकारी शिक्षकाच्या मृत्यूपश्‍चात त्यांच्या कुटुंबियांवर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले. हे पाहून त्यांच्या घोगरगाव केंद्रातील सहकारी शिक्षकांनी 73 हजार रुपयांचा निधी जमवला आणि शिक्षक परमेश्‍वर मोरे यांच्या कुटुंबियांना मदत केली.

या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत केलेल्या अर्थिक मदतीमुळे मोरे कुटुंबाला आधार मिळाला आहे. या शिक्षकांनी सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.

मदत निधी जमा करण्यासाठी विकास डावखरे, अनिलकुमार ढवळे, ईश्‍वर नागवडे, भारत जावळे, अक्षय पवार आणि घोगरगाव केंद्रातील शिक्षकांनी पुढाकार घेतला त्यांना निंबळकचे शरद कोतकर, संतोष गेरंगे व दादासाहेब घोलप यांनी मदत केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com