वर्तमानात शिक्षकांबद्दल सन्मानच; आत्मपरिक्षणाची गरज

वर्तमानात शिक्षकांबद्दल सन्मानच; आत्मपरिक्षणाची गरज

संगमनेर (संदीप वाकचौरे)

५ सप्टेंबर हा संपूर्ण भारतात माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. वर्तमान बदलत असले तरी काळ वेगाने पुढे जात आहे. माध्यमं बदलत आहेत. शिक्षणातही समग्र परिवर्तन होत आहे. मात्र अवघे जग बदलले तरी शिक्षकां प्रतीचा सन्मान वर्तमानातही सर्वांच्या मनात कायम आहे. वर्तमानातील काही दोष शिक्षकांच्या सोबत येत असले तरी त्यावर मात करण्यासाठी आणि सामाजिक दायित्व निभवण्यासाठी आत्मपरीक्षणाची गरज ही व्यक्त होत आहे.

शिक्षकी पेशाकडे बघण्याचा इतिहासापासून तो वर्तमानापर्यंत दृष्टिकोन हा सातत्याने वेगळा राहिला आहे. समाज नेहमीच शिक्षका प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. अशावेळी प्रवाहपतित होण्यापेक्षा आपले वेगळेपण टिकवावे लागणार आहेत. शिक्षक हा समाजासाठी आदर्शाची पाऊलवाट निर्माण करणारा घटक आहेत. त्यामुळे त्यांच्या कडून सातत्याने आदर्शाची अपेक्षा करण्यात येते. त्यामुळे शिक्षकांनी देखील बदलांना सामोरे जाताना अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.

दिगंबर देशमुख, माजी शिक्षण संचालक, पुणे

समाज बदलतो आहे. त्या वेगाने शिक्षणाची प्रक्रिया बदलणे अपेक्षित असते. नव्या बदलांचा वेध घेत शिक्षणाची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक ठरतात. विद्यार्थी ज्या वेगानं नवे तंत्रज्ञान प्राप्त करता आहेत. त्याच वेगाने शिक्षकांनाही बदलावे लागणार आहे. शिक्षक जितके ज्ञानसंपन्न होत राहतील. त्यांच्या प्रती आदर वृद्धिगत होत राहणार आहे. शिक्षकांचा सन्मान करण्याची परंपरा ही त्यांच्या ज्ञानाच्या सन्मानाची परंपरा आहे. त्यामुळे वर्तमानातही ज्ञानसंपन्न शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो. शिक्षक हा सातत्याने समाजासाठी आदर्शवत राहिला पाहिजे ही समाजाची धारणा काळ कितीही बदलला तरी कायम राहणार आहेत.

परशराम पावसे, शिक्षणाधिकारी

शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकांचा सन्मान करण्यात येतो हे वास्तव असले तरी आजही ग्रामीण भागात शिक्षक हा सर्वांसाठीच आदर्शाचा दिशादर्शक राहिला आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्न पेरणारा घटक असल्याने विद्यार्थ्यांसाठी तो नेहमीच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहे. त्यामुळे बदलणा-या परिस्थितीत शिक्षकांनी अधिक संपन्नता प्राप्त करण्याची गरज आहे. जग किती पुढे गेले तरीसुद्धा शिक्षकांचा सन्मान कायम राहणार आहेत. आमच्या आयुष्यात देखील शिक्षकांचे स्थान कायमच आदरणीय राहिले आहेत.

राजेंद्र रहाणे, सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (स्थापत्य) मुंबई

शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाज इतिहासापासून इतर वर्तमानापर्यंत शिक्षकांचा सन्मान करीत आला आहे. हा कोणत्या व्यक्तीचा सन्मान नाही तर समाजाचे उत्थान घडवण्यासाठी आणि गुणवत्ता टिकविण्यासाठी कष्ट करणाऱ्या समूहाचा सन्मान आहे. त्यामुळे गुणवत्तेसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षकांचा समाज आजही आदरच करीत आला आहेत. समाजांच्या अपेक्षांची परिपूर्ती करणारा घटक म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. शिक्षक हा नेहमीच सर्वांसाठीच दिशादर्शक आहे.

सुखदेव डेरे, माजी आयुक्त, महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे

काळ कितीही पुढे गेला असला तरी आणि समाजात किती परिवर्तन होत असले, तरी सुद्धा शिक्षक हा नेहमीच समाजासाठी आदर्शाची पाऊलवाट आहे. शिक्षक उद्याच्या समाजासाठी स्वप्न पेरणारा स्वप्न दूत असतो. शिक्षक जे स्वप्न पाहतो ते स्वप्न विद्यार्थ्यांच्या मनात पेरले जाते. त्या पेरलेल्या स्वप्नातून देशाला उत्तम नागरिक मिळत असतात. त्यामुळे शिक्षकाना वर्तमानातही कोणताच पर्याय नाही. तंत्रज्ञानाच्या जोरावरती माहिती मिळणार असली, तरी ज्ञानाची साधना करण्यासाठी विद्याथ्र्यांच्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. त्यांचेकडून प्रामाणिक पणाची अपेक्षा आहे.

श्रीमती शारु घुले, पालक

जगभरात वेगाने बदल होत असले, तरी शिक्षणाची प्रक्रिया देखील बदलत आहेत. केवळ पाठ्यपुस्तकावरती अवलंबून असणारे शिक्षण आता विविध माध्यमांच्या यांच्याद्वारे सुरु होऊ लागले आहेत. त्यामुळे शिक्षकांना देखील वेगाने बदलण्याची गरज आहेत. पाठ्यपुस्तका पलीकडे असलेला विचार अधोरेखित करून नवतंत्रज्ञानची सोबत घेऊन शिक्षकांना चालण्याची आजही गरज आहे. काळाच्या सोबत आणि काळाच्या पुढे चालत राहतात ते शिक्षक समाजासाठी नेहमीच वंदनीय राहिले आहेत. करोना काळात असलेल्या संकटावर मात करत शिक्षक चालत आहेत ही गोष्ट बदलाचा वेध घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते आणि म्हणूनच वेगळ्या वाटा जाणारे शिक्षक समाजासाठी प्रेरक असतात.

दिनकर टेमकर, सहसंचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, पुणे

पालकांवर येणाऱ्या जबाबदारी इतकीच जबाबदारी शिक्षकावर असते. लहान मुलाला बोलायला शिकवण्यापासून तर त्याची जीवनाशी ओळख करून देणं म्हणजे शिक्षक होणं. मनातील भय घालवून आत्मविश्वासाने सामोरी जात माणुसकी जपायची कला त्याच्यात रुजवनं म्हणजे शिक्षक होणे. शिक्षकांचे ऋण आहे ते कधी फेडू शकत. शिक्षकाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची आजही गरज आहे. शिक्षकांचे ऋण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतेच ते मान्य करण्याची वृत्ती स्वीकारावी लागते.

श्रीमती सुनंदा बोराडे, शिक्षिका

शिक्षक हा सर्वांच्या आयुष्यात महत्त्वाचा घटक आहे. करोना च्या कालावधीत शाळा आणि शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित झाले. आहे. समाज गतिमान करण्यासाठी शिक्षकाची ज्ञानाची भूक महत्त्वाची असते. त्यामुळे समाजालाही ज्ञानाच्या दिशेने प्रवास करता येतो असे ज्ञानवंत शिक्षक नेहमीच सर्वांसाठीच आदर्शवत राहिले आहेत. वर्तमानातही असे शिक्षक आपल्या अवतीभवती असतात त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आजही आणि उद्याही शिक्षकांबद्दल समाजमनात नेहमीच सन्मान राहणार आहे.

कैलास वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com