‘स्वराज’ ‘गुरूमाऊली’ साथ साथ!

सचिन नाबगे || गुरुकुल मंडळाला धक्का
‘स्वराज’ ‘गुरूमाऊली’ साथ साथ!

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जुनी पेन्शन हक्क संघटनेने स्वराज्य मंडळाच्या माध्यमातून शिक्षक बँक निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उतरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतू स्वराज्य मंडळाच्या काही नेत्यांनी गुरूकुल मंडळाबरोबर साटेलोटे करून उमेदवार्‍या पदरात पाडून घेतल्या. वास्तविक हा अभद्र आघाडीचा निर्णय स्वराज्य मंडळातील अनेक सभासदांना पटलेला नव्हता. परंतु जुनी पेन्शन हक्क संघटनेत फूट पडायला नको म्हणून शांततेची भूमिका घेतली होती.

गेल्या आठवड्यात स्वराज्य मंडळाशी संबंध नसलेल्यांनी मंडळाचा जिल्हा अध्यक्ष बदलाला असल्याचे फोटो सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. यामुळे आता अधिकृतपणे स्वराज्य मंडळाने बँकेच्या निवडणुकीत गुरूकुल ऐवजी गुरूमाऊली मंडळासोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे यांनी दिली.

सध्या स्वराज्य मंडळात या बाह्य हस्तक्षेपामुळे असंतोष निर्माण झाला. यापूर्वी गुरूकुलने ऐक्य मंडळाला बँकेत बरोबर घेऊन कसे संपविले हे सर्व जिल्ह्याने पाहिलेले आहे. तसेच त्या काळात केलेले विविध घोटाळे यामुळे सभासदांनी नाकारलेल्या गुरूकुल मंडळाबरोबरची अनैतिक आघाडी मान्य नसल्याचे स्वराज्य मंडळाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. स्वराज्य मंडळाच्या अनेक स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी संपर्क करून गुरूकुल बरोबर जाण्याच्या निर्णयावर फेरविचार करून योग्य मंडळाबरोबर जाण्याचा निर्णय घेण्याची मागणी केली होती, असे नाबगे यांनी सांगत बँकेत गेल्या 25 वर्षांत झाला नाही, असा सभासदाभिमुख कारभार शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

तांबे हेच भविष्यात सभासदांच्या कामधेनूला उत्कृष्टपणे चालवून सभासद हिताची जपणूक करू शकतात असा ठाम विश्वास वाटत असल्याने स्वराज्य मंडळाचा नोंदणीकृत अध्यक्ष नाबगे मंडळाच्या सर्व सहकार्‍यांसह शिक्षक बँक व विकास मंडळ निवडणुकीत तांबे यांच्या नेतृत्वाखालील गुरूमाऊली मंडळ (2015), ऐक्य मंडळ, शिक्षक भारती, शिक्षक एकलमंच या आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. यामुळे गुरूकुल मंडळाला मोठा धक्का बसला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com