बदल्यांच्या आदेशाकडे गुरूजींचे लक्ष

महिनाअखेर 'ग्रामविकास'चे सॉफ्टवेअर कार्यान्वित होण्याची शक्यता
बदल्यांच्या आदेशाकडे गुरूजींचे लक्ष
शिक्षक

अहमदनगर (प्रतिनिधी)

कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून रखडलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्हा बदली पात्र शिक्षकांची नावे, मोबाईल नंबर, मेल आयडी, आधार क्रमांक यासह अन्य आवश्यक माहिती अपडेट करण्यात आली असून ही अद्ययावत माहिती ग्रामविकास विभागाला सादर करण्यात आली आहे.

दरम्यान, शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरची तांत्रिक चाचणी अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होण्याची शक्यता ग्रामविकास विभागाच्या सुत्रांनी दिली. राज्यातील शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यासाठी मार्च महिन्यांत ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांची व्हिडीओ कॅन्फरंसव्दारे बैठक घेतली होती. या व्हीसीला ग्रामविकास विभागाचे सचिव, उपसचिव, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक हे उपस्थित होते. यात १२ विषयांवर चर्चा झाली होती.

 शिक्षक
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच
सर्वसाधारपणे कार्यक्षेत्रात दहा वर्षे आणि एकाच शाळेवर पाच वर्षे पूर्ण करणारे, अवघड क्षेत्रात तीन वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी हक्क आहे. यासह संवर्ग एकमधील दुर्धर आजाराने पीडित शिक्षक, मतीमंद मुलांचे माता पिता, पती आणि पत्नी एकत्रिकरण या प्रकारात मोडणारे शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत.

शिक्षकांच्या बदल्यासाठी यू डायसनूसार शाळा आणि शिक्षकांची माहिती अद्यावत करणे, शिक्षकांचे रोष्टर अद्यावत करून त्यास विभागीय आयुक्तांची मंजुरी घेणे, अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणे, शिक्षकांचे आधार अपडेट करणे, शिक्षकांचे समानिकरण करणे, न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षकांच्या नेमणूका करणे आदी विषयाचा समावेश होता. या सुचनानूसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने सर्व माहिती अद्यावत करून बदली पात्र शिक्षकांची माहिती, रिक्त जागांचा तपशील, शिक्षकांच्या जन्म तारीख, बारा अंकी आधार नंबर, पॅन नंबर, शालार्थ आयडीत तसेच शाळा बेस आणि शिक्षक बेस माहिती तयार करून ती ग्रामविकास विभागाला सादर केली आहे.

 शिक्षक
'प्रार्थना'चं निखळ सौंदर्य हिरव्या पैठणीत खुललं, पाहा PHOTO

दरवर्षी साधारणपणे ३१ मेच्या आत शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात येते. मात्र, दोन वर्षापासून कोविडच्या संसर्गामुळे नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. यंदा मात्र शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षण विभागाने मागील १५ दिवसांपूर्वीच शिक्षकांच्या सेवाविषयक माहिती ग्रामविकास सादर केलेली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात शिक्षकांच्या बदल्या झाल्यास त्याच कालावधीत शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू होणार आहे. तर १३ जुलैपासून शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक नेते आणि विविध शिक्षक मंडळ आणि संघटनाचे कार्यकर्ते यांची चांगलीच धावपळ उडणार आहे.

दरम्यान, ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदलीसाठी सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी राज्यातील काही जिल्हा परिषदेच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली एक समिती केली असून मागील आठवड्यात या समितीने नव्याने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या काही तांत्रिक चाचण्या होणे बाकी असल्याचे ग्रामविकास विभागाला कळविले आहे. यामुळे येत्या १५ दिवसांत तांत्रिक चाचण्यापूर्ण झाल्यावर ते शिक्षकांना बदलीसाठी खुले करण्यात येणार आहे. यात बदली हक्क प्राप्त शिक्षकांना त्यांची माहिती भरता येणार असून त्यानंतर एकाच वेळी राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया राबवता येणार आहे.

Related Stories

No stories found.