अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतरांना दिलासा दिला आहे. राज्यातील मान्यताप्राप्त अंशतः

अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणार्या कर्मचार्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. तसेच संदर्भाधिन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्य शासकीय कर्मचार्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित केलेली आहे.

राज्य शासकीय कर्मचार्यांप्रमाणे मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी संदर्भाधिन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित केलेली आहे.

संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. तसेच संदर्भाधिन शासन निर्णय क्रमांक 6 अन्वये राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक व मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक,

माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100 टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचार्यांच्या सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी स्तर-2 मध्ये जमा करण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे.

तथापि, अंशत: अनुदानित खाजगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू नसल्याने 6 व्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने अदा करण्याचा निर्णय घेतला.

त्या अनुषंगाने राज्यातील मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू नसल्याने दिनांक 1 जानेवारी 2006 ते 31 मार्च 2009 या कालावधींमधील 6 व्या वेतन आयोगाच्या फरकाची थकबाकी एकरकमी रोखीने अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.