शिक्षकांच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह; लस उपलब्ध नाही

शिक्षकांच्या लसीकरणावर प्रश्नचिन्ह; लस उपलब्ध नाही

संगमनेर |वार्ताहर| Sangmner

राज्यात करोना योद्धा म्हणून असलेल्या कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात आली होती. मात्र त्यातून प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. आता प्रशासनाने स्थानिक पातळीवर लसीकरण करण्यासंदर्भात पत्र दिले असले तरी स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध होत नसल्याने, शिक्षकांच्या पदरी नकार आला आहे. शिक्षकांचा लसीकरणा संदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्यामुळे त्यांचे लसीकरण होणार कसे असा प्रश्न संघटनांच्या वतीने विचारला जाऊ लागला आहे.

देशभरात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांचे लसीकरण करण्यात आले आहेत. मात्र करोनाच्या लढाईत प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून शिक्षक कर्मचारी उभे राहिले आहेत. शासन आदेशाप्रमाणे सर्वेक्षण करणे. नाकाबंदी च्या ठिकाणी पोलिसांसोबत काम करणे. स्थानिक पातळीवरील विलगीकरण कक्षात सेवा बजावणे. किराणा पोहचवणे, रेशन दुकानाचा ठिकाणी सेवा बजावणे यासारख्या सेवा वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने बजाविला आहेत. असे असले तरी शिक्षकांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.

त्यामुळे शिक्षकांचे लसीकरण करा अशी मागणी शिक्षक संघटनांनी वेळोवेळी निवेदन देऊन प्रशासनाकडे केली आहे. मात्र शिक्षकांच्या लसीकरण संदर्भात नियोजनाचा अभाव असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी स्थानिक तहसीलदारांच्या दूरध्वनी संदेशाच्या आधारे शिक्षण प्रशासनाने पत्र काढून स्थानिक पातळी लसीकरण करा असे सुचवले आहेत. तथापि स्थानिक पातळीवर लस उपलब्ध होत नसल्यामुळे आणि शिक्षक कर्मचार्‍यांना प्राधान्याची भूमिका नसल्यामुळे शिक्षकांना लसीकरणात अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षकांना प्राधान्य देणे विलास देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी आदेशित करावे अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.

परीक्षेच्या तोंडावर शिक्षकांचे लसीकरण करा

इयत्ता बारावीच्या परीक्षा मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्याचबरोबर पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती परीक्षांचे नियोजन शासनाकडून नियोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवरती शिक्षक मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक ठरणार आहे. अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांशी शिक्षकांचा संपर्क होणार आहेत. घरोघरी जाऊन शिक्षक सर्वेक्षण करीत आहेत. अशा परिस्थितीत लाखो विद्यार्थ्यांशी संपर्क येणार्‍या शिक्षकांना तात्काळ उपलब्ध करून देणे आवश्यक असणार आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात प्रश्न निर्माण होतील, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त होत आहेत.

इतर जिल्ह्यात शिक्षकांचे लसीकरण

राज्यात इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने नियोजन करून लसीकरण पूर्ण केले आहेत. शिक्षकांचा उपयोग प्रशासन सर्वच ठिकाणी करत असल्यामुळे ते मनुष्यबळ वापरण्यासाठी लसीकरण करून शिक्षकांना सुरक्षा प्रदान करण्यासाचे दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे. जिल्ह्याने नियोजनपूर्वक शिक्षकांचे लसीकरण केले आहे, मात्र अहमदनगर जिल्ह्यात शिक्षकांच्या लसीकरण यासंदर्भात नियोजनाचा अभाव असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार्‍या लसीकरणात शिक्षकांना लसी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येऊ लागले आहे. पंढरपूरच्या निवडणुकीत शिक्षक कर्मचार्‍यांचा वापर करण्यात आला. मात्र त्यातील काही शिक्षक पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून घरातील अनेक सदस्य पॉझिटिव्ह झाले. त्यातील एका शिक्षकाचे कुटुंबच उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांचा उपयोग करून घेताना किमान त्यांना लस तरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात येऊ लागले आहे.

लसीकरणासाठी नियोजनाची गरज

जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळी नियोजन केल्यास तात्काळ लसीकरण होणे शक्य आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात उपलब्ध होणारी लस त्या त्या केंद्रातील व जिल्हा परिषद गटातील शिक्षकांना दिली गेली तर अवघ्या तीन-चार दिवसात जिल्ह्यातील शिक्षकांचे लसीकरण करणे शक्य आहे. मात्र यासाठी महसूल प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. या संदर्भाने जिल्हा अधिकारी यांनी लक्ष घालून आरोग्य विभागाला आदेशित करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com