शिक्षक संघाचे काळे तर गुरुमाऊली मंडळाचे आरोळे अध्यक्ष

शिक्षक संघाचे काळे तर गुरुमाऊली मंडळाचे आरोळे अध्यक्ष

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल काळे, गुरुमाऊली मंडळ अध्यक्षपदी सुखदेव आरोळे तर महिला आघाडी श्रीमती कमल लाटे यांची निवड झाली आहे.

नेवासा तालुका प्राथमिक शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे ऑनलाईन त्रैवार्षिक अधिवेशन जिल्हा संघ अध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष शरद सुद्रिक, उपाध्यक्ष अर्जुन शिरसाठ, दक्षिण प्रमुख संतोष दुसुंगे, उत्तर जिल्हाप्रमुख राजकुमार साळवे, नगरपालिका जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, साहेबराव अनाप, सलिमखान पठाण, राज्य उपाध्यक्ष दत्तात्रय कुलट, मोहन पागिरे, रघुनाथ झावरे, संदीप मोटे, बाळासाहेब सरोदे, गुरुमाऊली मंडळ सरचिटणीस विठ्ठल फुंदे, रामेश्वर चोपडे, अरविंद घोडके, बाळासाहेब तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी जिल्हा संघाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे म्हणाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही राज्यातील सर्वात जुनी व सर्वात मोठी संघटना असल्याचे सांगून जुन्या पेन्शनसाठी ही संघटना आग्रही असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा पातळीवरील शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघ कटीबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

नेवासा तालुका शिक्षक संघाचे आधारवड व मार्गदर्शक ज्येष्ठ नेते मोहन पागिरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल गौरव करण्यात आला.

ऑनलाईन सभेत निवडलेली नवीन कार्यकारिणी

शिक्षक संघ- विठ्ठल काळे (अध्यक्ष), प्रविण सोनवणे (कार्याध्यक्ष), संजय हरकळ (सरचिटणीस), संदीप गटे (कोषाध्यक्ष), अमोल कदम (प्रसिद्धीप्रमुख), प्रफुल्ल भागवत (कार्यालयीन चिटणीस), अण्णासाहेब शिंदे (संघटक), जयप्रकाश राशीनकर (समन्वयक) तर उपाध्यक्षपदी - शांताराम सुरडे, सुनील अडसूळ, रविंद्र शिंदे व शिवराज जाधव.

गुरुमाऊली मंडळ- सुखदेव आरोळे (अध्यक्ष), राजेंद्र खैरे (कार्याध्यक्ष), संतोष रासकर (सरचिटणीस), भाऊसाहेब लोंढे (कोषाध्यक्ष), सूर्यकांत गट (प्रसिद्धी प्रमुख), शिवाजी लांघे (कार्यालयीन चिटणीस), संजय अंधारे (संघटक), भानुदास धाडगे (समन्वयक), तर उपाध्यक्ष- हनुमान नजन, महेंद्र वडिंकर, रमेश गुंड व सुरेश तळेकर.

महिला आघाडी- कमल लाटे (अध्यक्ष), मंगल सुंबे (कार्याध्यक्ष), अनिता वाघमारे (सरचिटणीस), अरुंधती ठुबे (कोषाध्यक्ष), संध्या शिंदे (प्रसिद्धीप्रमुख), सुवर्णा जाधव (कार्यालयीन चिटणीस), हर्षला ताके (संघटक), प्रतिभा पालकर (समन्वयक), उपाध्यक्ष- नलिनी काकडे, मंगल बनकर, तेरेसा बोधक, प्रतिभा गाडेकर व आश्विनी बारोवकर.

पदवीधर शिक्षक संघ - त्रिंबक गोरे (अध्यक्ष), सतिशकुमार भोसले (कार्याध्यक्ष), संजय काळे (सरचिटणीस), भाऊसाहेब मिसाळ (कोषाध्यक्ष), विजय अंधारे (प्रसिद्धीप्रमुख), गणेश शेलार (कार्यालयीन चिटणीस), भास्कर नागरगोजे (संघटक), तुकाराम वाघुले (समन्वयक), उपाध्यक्ष -साहेबराव मले व गोकुळ लवांडे.

मुख्याध्यापक शिक्षक संघ- नामदेव दहातोंडे (अध्यक्ष), गोपीनाथ पवार (कार्याध्यक्ष), कैलास धानापुणे (सरचिटणीस), खाँजाभाई उस्ताद (कोषाध्यक्ष), उत्तम माळी (प्रसिद्धीप्रमुख), मारुती सूळ (संघटक), जगन्नाथ नजन (समन्वयक).

शिक्षक संघ उच्चाधिकार समिती- कैलास निकम (अध्यक्ष), सचिन कोलते (कार्याध्यक्ष), भाऊसाहेब सावंत (सरचिटणीस), सदस्य- विजय करवंदे व प्रभाकर पटारे

गुरुमाऊली मंडळ उच्चाधिकार समिती- बापूसाहेब सोनवणे (अध्यक्ष), गणेश लंघे (कार्याध्यक्ष), सुरेंद्रकुमार जासूद (सरचिटणीस), सदस्य - तुकाराम गोरे व एकनाथ राव.

जिल्हा प्रतिनिधी- भास्कर तांबे, कल्याण नेहुल, अरविंद घोडके, रामचंद्र गजभार, दिगंबर नागपुरे, अशोक पंडित, राजेंद्र चापे, शिरीष पाटोळे, संतोष दरवडे, शिवाजी घुले, श्रीमती मीनाक्षी अवचरे व सुवर्णा भालसिंग.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com