पती-पत्नी एकत्रिकरणात राज्यात 3 हजार 400 गुरुजींच्या बदल्या

संवर्ग 3 आणि संवर्ग 4 मधील पात्र शिक्षकांच्या आता बदल्याची प्रक्रिया
पती-पत्नी एकत्रिकरणात राज्यात 3 हजार 400 गुरुजींच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

चार वेळा पुढे ढकलेल्या आणि अडथळ्यांची शर्यत पार करत राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यामधील संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील पात्र शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. सोमवारी राज्यातील संवर्ग दोनमधील पती-पत्नी एकत्रिकरणात राज्यातील 3 हजार 619 पात्र शिक्षकांपैकी 3 हजार 400 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. यात नगर जिल्ह्यातील 172 गुरूजींचा समावेश आहे.

करोनाचे दोन वर्षे करोना आणि त्यानंतर मागील वर्षी बदल्यांसाठीचे ऑनलाईन सॉफ्टरवेअर निर्मिती यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना तीन वर्षापासून मुहूर्त मिळाला नव्हता. मात्र, 30 नोव्हेंबरपासून गुरुजींच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात नगर जिल्ह्यातील संवर्ग एक मधील 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून शुक्रवारी (दि. 6) रोजी 213 शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरण (संवर्ग दोन) साठी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. यातील 172 शिक्षकांच्या नियमानूसार बदल्यांची प्रकिया होवून त्यांच्या बदल्याच्या ठिकाणाचे आदेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. संवर्ग दोनमधील शिक्षकांच्या राज्यातील बदल्यांचा आकडा हा 3 हजार 400 आहे.

राज्यभर शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अडथळ्यांची शर्यत पार करत ही पक्रिया सुरु आहे. संवर्ग एकमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून यात नगर जिल्ह्यात 299 प्राथमिक शिक्षकांची सोय झालेली आहे. त्यानंतर मागील आठवड्यात संवर्ग दोनमधील 216 पैकी 213 शिक्षकांनी पती-पत्नी एकत्रिकरण अंर्तग बदलीसाठी ऑनलाईन अर्ज भरलेले होते. ऑनलाईन बदल्यांसाठी शिक्षकांना 30 शाळांचे पर्याय सॉफ्टरवेअरमध्ये भरलेले होते. जिल्ह्यात 1 हजरी 154 प्राथमिक बदल्यांसाठी पात्र आहेत.

यात बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची संख्या ही 793 आहे. संवर्ग 1 हजार 469 शिक्षक आणि संवर्ग 2 मध्ये 216 शिक्षकांचा समावेश होता. मात्र, यातील 213 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यातील 172 शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. आता संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्यांनी पेसा (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानंतर संवर्ग 4 मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर 18 फेबु्रवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

संवर्ग दोनच्या जिल्हानिहाय बदल्या

नगर 172, अकोला 28, अमरावती 192, औरंगाबाद 203, बीड 142, भंडारा 20, बुलढाणा 53, चंद्रपूर 109, धुळे 65, गडचिरोली 99, गोंदिया 45, हिंगोली 57, जालना 62, जळगाव 103, कोल्हापूर 66, लातूर 57, नागपूर 137, नांदेड 146, नंदूरबार 99, नाशिक 201, उस्मानाबाद 75, पालघर 47, परभणी 81, पुणे 253, रायगड 81, रत्नागिरी 105, सांगली 51, सातारा 165, सिंधूदुर्ग 67, सोलापूर 98, ठाणे 70, वर्धा 84, वाशिम 26, यवतमाळ 141 यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com