मागील वर्षीच्या संच मान्यतेनूसार होणार गुरूजींच्या बदल्या

ग्रामविकास विभागाचे आदेश : बिंदू नामावलीबाबतचे अधिकारी सीईंओ पातळीवर
मागील वर्षीच्या संच मान्यतेनूसार होणार गुरूजींच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या संच मान्यता झालेल्या नाहीत. यामुळे सद्यस्थितीत 2021-22 च्या संच मान्यता या 2020-21 नुसार कायम ठेवावी, अशी सुचना शालेय शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागाला केलेली आहे. त्यानूसार 2022 मध्ये होणार्‍या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मागील वर्षीच्या (2020-21) संच मान्यतेनूसार कराव्यात, असे आदेश ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी मागील आठवड्यात ऑनलाईन प्रणाली कार्यान्वित (संकेत स्थळ) करण्यात आलेली आहे. या प्रणाली बाबत शिक्षणाधिकारी यांनी शिक्षण विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अवगत करून संबंधीत संकेतस्थळास दररोज भेट देवून संकेतस्थळावरील कार्यवाहीची मर्यादा कटाक्षाने पाळाव्यात, मागील वर्षीच्या संच मान्यतेच्या आधारी यंदाच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, कोविडमुळे बर्‍याच जिल्हा परिषदांचे बिंदू नामावली विभागीय आयुक्त मागासगर्वीय कक्षा यांच्याकडू तपासणी झालेली नाही.

त्यामुळे शासन निर्णयातील तरतुदीनूसार यावर्षीच्या आंतरजिल्हा बदल्या साखळी पध्दतीने कराव्यात किंवा विभागीय आयुक्त मागासवर्गी कक्ष यांच्याकडून यापूर्वी तपासणी करून घेतली असल्या त्यानूसार शिक्षकांच्या बदल्या कराव्यात याबाबतचे निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर सोपवल्या आहेत.

काही शिक्षकांच्या बदल्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. या शिक्षकांची बदली एका शाळेतून दुसर्‍या शाळेत करतांना न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आधी या शिक्षकांची ऑफलाईन बदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास ग्रामविकास विभागाने कळविले आहे. तर काही शिक्षकांच्या बदलीबाबत न्यायालयाने विनंतीचा व्हावा, असे आदेश न्यायालयाने दिलेल्या असल्यास अशा शिक्षकांना ऑनलाईन बदली प्रक्रियेमध्ये भाग घेण्याबाबत लेखी कळवावे आणि व त्यांची पोहोच जपून ठेवावी.

आंतरजिल्हा बदली प्रकरणात बदलीपात्र शिक्षकाकडे ज्या जिल्हा परिषदेत जायचे आहे, त्या जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावलीनूसार पद रिक्त असल्यास अथवा भविष्यात रिक्त होणारे पद असल्याचे ना हरकत प्रमाणात असल्यास अशा शिक्षकांचा ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या यादीत समावेश करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिलेले आहेत. संचमान्यतेमुळे अतिरिक्त झालेल्या शिळकांचे समायोजन, पदस्थापना ही ऑनलाईन बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर करण्यात यावी, असे आदेशात नमुद केलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com