संवर्ग 3 साठी 218 शिक्षकांचे बदलीचे अर्ज

गुरूवारी बदली होण्याची शक्यता
संवर्ग 3 साठी 218 शिक्षकांचे बदलीचे अर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आता अंतिम होण्याच्या दिशेने सुरू झाली आहे. बदली पात्र संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मंगळवार (दि.17) रोजी संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्यांनी पेसा (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक अशा 218 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केले असून त्यांची बदलीची प्रक्रिया गुरूवार (दि.19) ला होण्याची शक्यता आहे.

नगरसह राज्यात 30 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पध्दतीने गुरुजींच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाल. यात जिल्ह्यातील संवर्ग एक मधील 299 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून पती-पत्नी एकत्रिकरण (संवर्ग दोन) मध्ये 172 शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. काल मंगळवारी संवर्ग 3 मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक ज्यांनी पेसा (आदिवासी भागात) किमान तीन वर्षे सेवा केलेले शिक्षक अशा 218 शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज केले आहे.

नियमानूसार या शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया गुरूवारी (उद्या) होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संवर्ग 4 मधील बदली पात्र शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया होणार आहे. या चारही संवर्गातील शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर 18 फेबु्रवारीपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना बदलीचे आदेश मिळणार असल्याचे जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com