शिक्षकांना ‘स्वाध्याय’ साठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्या

शिक्षक भारतीची मागणी : वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण
शिक्षकांना ‘स्वाध्याय’ साठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ द्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळावी अशी मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्यावतीने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांकडे पत्राद्वारे करण्यात आली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांनी दिली आहे.

वरीष्ठश्रेणी आणि निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात प्रशिक्षणार्थींना दिलेल्या मोड्युल (प्रकरणे) ची संख्या जास्त आहे. व्हिडिओंची संख्या व व्हिडिओ पाहण्यासाठी लागणारा वेळ खूप जास्त आहे. पीडीएफचे वाचन, व्हिडिओचे निरीक्षण करून स्वाध्याय हस्ताक्षरात लिहिणे व लिहिलेल्या स्वाध्यायांचे पीडीएफ अपलोड करणे यासाठी 15 जुलै 2022 पर्यंतचा दिलेला कालावधी खूप कमी पडत आहे.

वरीष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे स्वाध्याय जमा करण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून मिळावी अशी मागणी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव गाडगे तसेच शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हा अध्यक्ष आशा मगर, मोहंमद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, संभाजी पवार, हनुमंत रायकर आदींनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com