‘त्या’ शिक्षकांना उन्हाळी सुट्टी लागू असल्याचे आदेश काढावे

शिक्षक परिषदेची शिक्षण आयुक्त सोलंकी यांच्याकडे मागणी
‘त्या’ शिक्षकांना उन्हाळी सुट्टी लागू असल्याचे आदेश काढावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उन्हाळी सुट्ट्यांच्या काळावधीत करोनाची सेवा देणार्‍या शिक्षकांना नियम क्रमांक 16, उपनियम क्रमांक 18 (अ) मधील तरतुदीनुसार अर्जित रजा लागू असल्याबाबतचे परिपत्रक काढण्याची मागणी राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक द. गो. जगताप यांना दिले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक करोनाच्या कामासाठी सेवा देत आहेत. त्या शिक्षकांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्याशर्ती) नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16, उपनियम क्रमांक 18 (अ) मधील तरतुदीनुसार अर्जित रजा लागू आहे. याबाबत तक्रारी उद्भवू नयेत, यादृष्टीने परिपत्रक काढणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या सुट्टी लागू होण्यासाठी शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com