शिक्षकांनी सोनई गटातील शालाबाह्य मुलांचा केला सर्व्हे

ऊसतोडणी कामगारांच्या 72 मुलांना शालेय साहित्य वाटप
शिक्षकांनी सोनई गटातील शालाबाह्य मुलांचा केला सर्व्हे

सोनई |वार्ताहर| Sonai

मुळा साखर कारखान्याच्या गट परीसरात जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी ऊसतोडणी कामगारांचा सर्व्हे करून शिक्षणापासून वंचित असलेल्या 72 मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप करून शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेतले.

राज्य शिक्षण विभागाने हंगामी स्थलांतरित मुलांकरिता 20 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2022 कालावधीत ऊसतोड मजूर, विटभट्टी व दगडखाण मजुरांचा सर्व्हे करण्याची योजना हाती घेतली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशिष येरेकर व संभाजी लांगोरे,जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे अशोक कडूस, गटविकास अधिकारी संजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा कारखाना हद्दीत असलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यात जाऊन शिक्षकांनी सर्व्हे करून शिक्षणाबद्दल प्रबोधन केले.

नेवासा गटशिक्षणाअधिकारी शिवाजी कराड, पत्रकार विनायक दरंदले, पत्रकार सुनील दरंदले यांच्याहस्ते मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी केंद्रप्रमुख आसाराम कदम, मुख्याध्यापक हनुमंत फुंदे, मुख्याध्यापक संदीप सोनवणे, प्राचार्य संजय लोंढे, शिक्षक सादिक शेख, रमेश पंडित, मच्छिंद्र शेटे, अंजली महामेर, प्रतिभा सानप, कल्पना माळवदे, प्रतिभा अव्हाड, आरती नवाळे, मानवतकर, अरुण पालवे, शरद खंडागळे, बाळासाहेब पाटोळे उपस्थित होते.

मुळा कारखान्याचे मार्गदर्शक आमदार शंकरराव गडाख यांचा नेहमीच सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना अग्रक्रम असतो.म्हणूनच ‘मुळा’च्यावतीने गटातील दोन ठिकाणी वर्ग भरण्याची व्यवस्था दोन दिवसांत केली जाईल.

- शरद बेल्हेकर, कार्यकारी संचालक, मुळा कारखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com