शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मे अखेर पूर्ण होतील

शिक्षक समितीस शिक्षणाधिकार्‍यांची ग्वाही
शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मे अखेर पूर्ण होतील

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षकांच्या वरीष्ठ् वेतन श्रेणीच्या प्रस्तावाची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी निवड समितीसमोर ठेवले जातील. त्यासाठी निवड समितीला तारखेची मागणी केली आहे. मे अखेर सर्व प्रस्तावांना अंतिम मंजुरी मिळेल अशी ग्वाही प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शिक्षक समितीच्या शिष्टमंडळास दिली.

शिक्षकांचे प्रलंबित वरिष्ठ वेतेनश्रेणीचे प्रस्ताव व इतर प्रश्नांसंदर्भात शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी पाटील यांची भेट घेवून चर्चा केली. त्यावेळेस पाटील यांनी ही माहिती दिली. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष संजय धामणे, कार्याध्यक्ष भास्कर नरसाळे, अंबादास मंडलिक, जालिंदर गोरे, विजय कांडेकर, सुनील लोंढे, गणेश कुलांगे, स्वाती गोरे, दिपाली दाताळ, मंगल अष्टेकर आदि सदस्यांचा समावेश होता.

पाटील म्हणाले, जिल्ह्यात हजर झाल्याबरोबर मी प्राधान्याने वरिष्ठवेतन श्रेणीचे काम हाती घेतले. 230 शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या तालुक्याकडून दुरुस्त करून घेण्यास बराचसा कालावधी गेला.230 पैकी 214 प्रस्ताव पात्र तर 16 प्रस्ताव अपात्र ठरले आहेत. या प्रस्तावांच्या अंतिम मंजुरीसाठी निवड समितीची तारीख मागितली आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर फरकासहित ते शिक्षकांना देण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

यावेळेस शिक्षकांच्या बदल्या, मेडिकल बिलांसाठी निधी उपलब्ध करून देणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची सेवाजेष्ठता इत्यादी प्रश्नांवर साधकबाधक चर्चा झाली.

Related Stories

No stories found.