अश्लील चाळे करणार्‍या गुरूजीला दोन दिवस पोलीस कोठडी

अश्लील चाळे करणार्‍या गुरूजीला दोन दिवस पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थींनी सोबत अश्लील चाळे करणारा गुरूजी संतोष एकनाथ माघाडे (वय 34, रा. गंगापूर जि. औरंगाबाद) याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

नगर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये माघाडे हा गुरूजी आहे. माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींना शाळेत बोलावून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थिनीने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाच ते सहा अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत हा प्रकार घडला आहे. सोमवारी माघाडे विरोधात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.