शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारेच

नव्या सुधारणा सर्व शैक्षणिक संस्थांना लागू, जीआर जारी
शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारेच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महाराष्ट्रातील शिक्षक भरती ही ‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार असल्याने सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाच्यावतीने जीआर जारी करण्यात आला असून त्यात नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत. या नवीन तरतुदी सर्व शैक्षणिक संस्थांना लागू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण संस्था याबाबत काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पोर्टलद्वारे शिक्षक भरतीला शिक्षण संस्थांचा विरोध आहे. काही वर्षापूर्वी काही प्रमाणात शिक्षक भरती झाली होती. पण त्यात गैरव्यवहार झाल्याने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे आता पुन्हा नव्याने शिक्षक भरती होत आहे. यापुढे शिक्षक भरती ‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यात सुधारणा करण्ययात आल्या आहेत. एका उमेदवरास गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाचवेळा परीषेची संधी उपलब्ध राहिल या तरतुदीऐवजी उमेदवारास प्रत्येक वेळी नव्याने होणार्‍या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहिल.

उमेदवाराचे त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीला अंतिम निकाल प्रसिध्द झाल्यानंतर नव्याने येणार्‍या जाहीरातीसाठी विचारात घेतले जाणार नाही असे समाविष्ट करण्यात आले आहे. शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादेत 2 वर्षांची शिथिलता आणण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल. या चाचणीसाठी उमेदवाराने निवडलेले माध्यम केवळ चाचणी परीक्षेपुरते मर्यादित राहिल या चाचणीच्या माध्यमाचा निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहीराती येतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com