अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गत बदल्यामध्ये विस्थापित होऊन गैरसोईच्या बदल्या झालेले शिक्षक न्यायालयात गेले होते. या शिक्षकांना सोमवारी न्यायालयाच्या आदेशानुसार

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. डी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पदस्थापना देण्यात आली. पदस्थापनेची ही प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती प्रताप पाटील शेळके यांनी पुढाकार घेतला.

बदल्यांमध्ये विस्थापित होऊन पती-पत्नी एकत्रिकरण याचा लाभ न मिळालेले 93 शिक्षक न्यायालयात गेले होते. या शिक्षकांची सोय करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर या शिक्षकांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार 64 शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्यांना काल प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदस्थापना दिली. यात पाच शिक्षकांनी नकार दिल्याने 59 शिक्षकांची सोय झाली आहे. यामुळे या शिक्षकांनी समाधान व्यक्त केले आहे.

काल झालेल्या पदस्थापनेची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली आहे. यामुळे शिक्षकांचे समाधान असून उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके यांच्यामुळे शिक्षकांवरील अन्याय दूर झाला आहे. भविष्यात उपाध्यक्ष शेळके यांनी शिक्षकांच्या पाठीशी उभे राहवे.
- दत्तात्रय कुलट, राज्य उपाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संंघ.