शिक्षक, शिक्षकेत्तरांचे पगार सप्टेंबरपर्यंत ऑफलाईन
सार्वमत

शिक्षक, शिक्षकेत्तरांचे पगार सप्टेंबरपर्यंत ऑफलाईन

Arvind Arkhade

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

राज्यातील अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना शालार्थ क्रमांक दिलेला नसल्यामुळे त्यांचे सप्टेंबर 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत. या परिपत्रकानुसार पुढील प्रकारच्या देयकांचा समावेश आहे.

13 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या 276 शिक्षकांचे व उच्च माध्यमिक शाळांमधील पुरवणी मागणीद्वारे मान्य केलेल्या 171 शिक्षकांचे वेतन.

6 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2010-11 या वर्षातील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेल्या 1000 पदांपैकी व्यपगत केलेल्या 428 पदांपैकी पुनरूज्जिवित केलेल्या 68 पदांचे वेतन.

1 जुलै 2016 व 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या एकूण 8970 शिक्षक-कर्मचार्‍यांचे वेतन. 19 सप्टेंबर 2016 अन्वये अनुदानास पात्र घोति केलेल्या 1628 शाळा, 2452 तुकड्यावरील 19247 शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांना अनुदान मंजूर केले असून त्यापैकी 1266 शाळा व 1680 तुकड्यांवरील प्रत्यक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन.

5 जानेवारी 2019 शासन निर्णयामधील पात्र ठरलेल्या 36 माध्यमिक विद्यालयातील 181 शिक्षक व 127 शिक्षकेतर तसेच 11 माध्यमिक शाळांच्या तुकड्यावरील 41 शिक्षक असे एकूण 222 शिक्षक व 127 शिक्षकेपदांना तसेच अन्य शिक्षकांना 1 एप्रिल 2018 पासून 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com